डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी घरगुती उपाय
धावपळीच्या जीवनशैलीमुळे महिला अनेकदा शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कामातून वेळ काढून आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. कामाचा तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे झोप पूर्ण होत नाही. झोप पूर्ण न झाल्यामुळे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येऊ लागतात. डोळ्यांच्या खाली आलेली काळी वर्तुळ त्वचेचे सौदंर्य पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे व्यवस्थित झोप घेणे गरजेचे आहे. दिवसभर काम करून थकून आल्यानंतर शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. पण अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ लावपवण्यासाठी अनेक महिला मेकअप करणे, बाजारात उपलब्ध असलेले महागडे फेशिअल करणे, वेगवेगळ्या क्रीम्स लावणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. मात्र तरीसुद्धा डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ कमी होत नाहीत. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ आल्यानंतर चेहरा नेहमीच थकल्यासारखा वाटतो. तसेच शरीरात आर्यनची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोळ्यांखाली काळी वर्तुळ येऊ लागतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा कसा वापर करावा, याबद्दल सांगणार आहोत.
डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर तुम्ही करू शकता. यामुळे त्वचा चांगली दिसेल. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बटाट्याचा रस घेऊन त्यात दोन चमचे दूध घालून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर कापसाच्या गोळ्याने डोळ्यांखाली आलेल्या डागांवर तयार केलेले मिश्रण लावून ठेवा. 20 मिनिटं झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमचे डोळ्यांखालची त्वचा चांगली होईल आणि त्वचासुंदर दिसेल.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
त्वचेवर बटाट्याचा रस लावल्यामुळे डोळ्यांखालची त्वचा सुंदर दिसते. शिवाय त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, पिंपल्सचे डाग इत्यादी गोष्टी कमी होऊन जातात. उष्णतेमुळे त्वचेवर पिंपल्स आणि फोड मोठ्या प्रमाणावर येऊ लागतात. त्यामुळे पिंपल्स घालवण्यासाठी तुम्ही बटाट्याचा वापर करू शकता. शिवाय त्वचा सैल होऊन सुंदर दिसू लागते. बटाट्यामध्ये आढळून येणारे गुणधर्म त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात.