शिवजयंतीनिमित्त जाणून घ्या शिवगर्जना (फोटो सौजन्य - Pinteres)
शिवाजी महाराज हे नाव उच्चारलं तरीही छाती अभिमानाने फुगते. महाराष्ट्राच्या मातीतील हा सिंह असा गरजला की 395 व्या जयंतीच्या वेळीही केवळ आणि केवळ त्यांच्याच नावाचा उद्घोष आहे. गड आणि दुर्ग दणाणून सोडणारा, सिंहासारखा निधड्या छातीचा, शौर्य आणि पराक्रमाची आणि दूरदृष्टीची यशोगाथा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
१९ फेब्रुवारी रोजी जगभरात शिवरायांची जयंती साजरी होते आहे. यावेळी अभिमानाने शिवगर्जना दिल्या जातात. प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात शिवरायांची प्रतिमा ही कायमस्वरुपी जपलेली आहे आणि अन्यायाविरूद्ध लढण्याची सतत प्रेरणा देत राहणारे आणि स्वराज्यासाठी अहोरात्र झुंजणाऱ्या या शिवबासाठी स्फूर्तीदायक अशा शिवगर्जना आपण या लेखातून जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Pinterest)
हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी!
शिवरायांचे सैन्य जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा हर हर महादेव! जय भवानी! जय शिवाजी! अशा उद्घोषणा द्यायचे असे म्हटले जाते. आजही एखाद्या कामाची सुरूवात करताना शिवरायांचे हे बळ आपल्याला मिळो यासाठी ही उद्घोषणा आणि गर्जना केली जाते. एकत्रित ही घोषणा ऐकली की एक वेगळेच बळ शिवसैनिकांना मिळते आणि कामाचा हुरूप येतो.
क्षत्रियकुलावतंस….
आस्ते कदम… आस्ते कदम… आस्ते कदम…महाराSSSSSSSSSज…
गडपती, गजअश्वपती, भूपती, प्रजापती…सुवर्णरत्नश्रीपती…
अष्टवधानजागृत, अष्टप्रधानवेष्टित…न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत…
राजनीतीधुरंधर, प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर…
महाराजाधिराज…राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो…!
या प्रत्येक शब्दामुळे ऊर भरून येतो आणि या प्रत्येक शब्दाचे अर्थही वेगळे आहेत ज्यामुळे तुम्ही ही गर्जना करता. ही गर्जना नक्की काय आहे याचा अर्थ तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेची साक्ष असणारी ही गर्जना नेहमीच सर्वार्थाने मनात राहणारी आहे.
शिवाजी महाराजांच्या शिवगर्जना