Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Child Constipation: बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर आरोग्याकडे खूप जास्त लक्ष दिले जाते. बाळ शी करताना जोर लावतं, चेहरा लाल होतो, कुंथतं किंवा थोडं रडत असेल तर घाबरून न जाता योग्य सल्ला घेणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 02, 2026 | 02:30 PM
बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक

बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक

Follow Us
Follow Us:

Child Constipation: बाळ झाल्यानंतर आईला खूप प्रश्न असतात आणि त्यापैकी त्याच्या सुसू आणि शी बाबतदेखील अनेक प्रश्न निर्माण होतात आणि बाळाला त्रास होऊ नये हीच एक त्यामागे आईची धडपड असते. कारण घरातील आणि बाहेरील सगळेच अशा वेळी वेगवेगळे सल्ले देत असतात. तुमचं बाळ जर शी करताना जोर लावतं, चेहरा लाल होतो, कुंथतं किंवा थोडं रडतं असं होत असेल आणि आई म्हणून लगेच मनात येतं का? “बाळाला constipation तर नाही ना?” पण खरं सांगायचं तर प्रत्येक वेळी असं होणं म्हणजे constipation नसतं. कारण अनेक बाळांमध्ये हे नॉर्मल असू शकतं. पण मग प्रश्न पडतो की असं का होतं? तर हेच आपण आपल्या व्हिडिओतून समजून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Cancer: कर्करोगाचा धोका वेळीच ओळखायचा? नियमित आरोग्य तपासणीतील ‘या’ चाचण्या ठरू शकतात अतिशय महत्त्वाच्या

बाळ नक्की का कुंथतं ते आधी जाणून घेऊया:

लहान बाळांना शी करताना पोटाचे आणि गुदद्वाराचे स्नायू योग्य पद्धतीने coordinate करायला थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे शी मऊ असूनही बाळ कुंथू शकतं. कारण बाळ शी करायलाही नव्याने शिकत असतं. अशा वेळी बाळ कुंथू शकतं, थोडा जोर लाऊ शकतं, रडू शकतं वा त्याचा चेहरा शी करताना लाल होऊ शकतो आणि हे अगदी सामान्य आहे. म्हणून फक्त बाळ किती जोर लावतंय हे न पाहता शी कशी आहे, बाळाला खरंच त्रास होतोय का आणि बाकीचं बाळाचं वर्तन कसं आहे हेही पाहणं महत्त्वाचं. बाळाला शी सॉफ्ट होत असेल तर बाळ व्यवस्थित दूध पितंय आणि आनंदीदेखील आहे हे प्रत्येक आईने समजून घ्यायला हवं.

बाळाला बद्धकोष्ठता झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

बाळाला बद्धकोष्ठता आहे हे नक्की कधी समजावं, याची काही लक्षणं आहेत. बाळ जर अगदी कडक आणि गोळ्यासारखी शी करत असेल
बाळाला शी करताना खूपच त्रास होत असेल आणि वेदना होत असतील, शौचामधून रक्ताचे थेंब आले असतील, बाळाचं पोट सतत फुगलेलं, वाटत असेल वा शी करताना पोट फुगत असेल किंवा बाळ जर कमी दूध पित असेल तरच बाळाला बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय असं समजून जावे, अशा वेळी आईने काय करायला हवे जाणून घ्या.

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

उपचार:

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईने अजिबात घाबरून जाऊन नये. बाळाला नक्की काय झालंय याचं टेन्शन घेऊ नये. तसंच अशावेळी बाळाला स्वतःहून पाणी, मध, घरगुती उपाय किंवा औषध तर अजिबात देऊ नये. अशावेळी सर्वात पहिल्यांदा आईने बालरोगतज्ज्ञांंचा सल्ला घ्यावा. तुमचं बाळही potty करताना असं कुंथतं का? तसं असेल तर घाबरून न जाता आम्ही सांगितलेली लक्षणं बघा. कारण सगळ्या वेळी कुंथणं म्हणजे बाळाला बद्धकोष्ठता झाली आहे असं नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाळ शी करताना जोर लावत असेल तर त्याला बद्धकोष्ठता असते का?

    Ans: नेहमीच नाही. विशेषतः लहान बाळांमध्ये शी करताना चेहरा लाल होणे, कुंथणे किंवा काही वेळ जोर लावणे हे शी मऊ असल्यास सामान्य असू शकते. याला इन्फंट डिस्केझिया असे म्हटले जाते.

  • Que: बाळाला बद्धकोष्ठता आहे हे कसे ओळखावे?

    Ans: शी खूप कडक किंवा कोरडी असणे, शी करताना वेदना होणे, शीमध्ये रक्त दिसणे किंवा वारंवार कडक गोळ्यासारखी शी होणे ही बद्धकोष्ठतेची संभाव्य चिन्हे आहेत.

  • Que: बाळ शी करताना चेहरा लाल का करते?

    Ans: शी करण्यासाठी पोटाचे स्नायू आणि श्रोणीचे स्नायू यांचा समन्वय साधण्याची प्रक्रिया लहान बाळांना शिकावी लागते. त्यामुळे काही बाळे शी करताना जोर लावतात किंवा चेहरा लाल करतात.

Web Title: Child constipation why does a baby strain while passing stool understand the difference between constipation and normal straining

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • baby care tips
  • constipation
  • newborn baby

संबंधित बातम्या

बाळ जन्मले, पण पुरुष आहे की स्त्री स्पष्ट होईना! मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात जन्म
1

बाळ जन्मले, पण पुरुष आहे की स्त्री स्पष्ट होईना! मुंबई पालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजात जन्म

Breastfeeding: C Section नंतर स्तनपान, सुरुवात सोपी होण्यासाठी सोप्या टिप्स
2

Breastfeeding: C Section नंतर स्तनपान, सुरुवात सोपी होण्यासाठी सोप्या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.