कॅल्शियमच्या कमतरतेमुळे सतत सांधे दुखतात? मग दह्यात मिक्स करून खा 'या' बिया
वाढत्या वयात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. कधी सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना, शरीरात निर्माण होणारी पोषक घटकांची कमतरता, अचानक हातापायांमध्ये मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा दिसून येतात. वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. हाडांमधून कटकट आवाज येणे, चालताना किंवा वर उठताना गुडघे दुखणे, कंबर दुखी इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी दह्यासोबत कोणत्या बिया खाव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बियांचे सेवन केल्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारेल, सांध्यांमधील वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
हाडं ठिसूळ झाल्याने कधीही शरीराचा होईल सांगाडा, Bone Cancer ची 6 लक्षणं दिसताच गाठा हॉस्पिटल
अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अळशीच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक हाडांमधील कॅल्शियमची कमतरता भरून काढतात. अळशीच्या बियांमध्ये नैसर्गिक ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स खनिजे आढळून येतात. या बियांच्या सेवनामुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि शरीर कायमच निरोगी राहते. वाटीभर दह्यात अळशीच्या बिया मिक्स करून खाल्यास कॅल्शियमची कमतरता दूर होईल. तसेच यामध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
तवा गरम करून त्यावर अळशीच्या बिया खमंग भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बिया बारीक करून घ्या. त्यानंतर दह्यात तुम्ही अळशीच्या बियांची पावडर टाकून नियमित सेवन करू शकता. मात्र सर्दी खोकला किंवा वाताच्या समस्यांने त्रस्त असलेल्या लोकांनी दह्याचे कमी सेवन करावे. अन्यथा कफ किंवा सर्दी वाढू शकते.
भोपळ्याच्या बिया खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या बियांमध्ये असलेले घटक शरीराला योग्य ते पोषण देतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आढळून येते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित या बिया खाल्यास शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून निघेल आणि सांध्यांच्या हालचाली सुरळीत होईल.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करायला खूप जास्त आवडते. या बियांचे सेवन केल्यामुळे हाडांना आलेली सूज कमी होते. याशिवाय या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स आणि फायबर आढळून येते. शरीरात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता भरून कढण्यासाठी सूर्यफुलाच्या बियांचे सेवन करावे.
कॅल्शियम म्हणजे काय?
कॅल्शियम हे एक महत्वाचे खनिज आहे, जे आपल्या शरीरातील हाडे आणि दातांसाठी आवश्यक असते. ते स्नायूंच्या कार्यासाठी, नसांच्या कार्यासाठी आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी देखील आवश्यक असते.
कॅल्शियमचे स्त्रोत काय आहेत?
कॅल्शियम दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात आढळते, जसे की दूध, दही, आणि चीज. तसेच, हिरव्या पालेभाज्या, मासे आणि काही कडधान्यांमध्ये देखील कॅल्शियम असते.
कॅल्शियमचे जास्त प्रमाण हानिकारक असू शकते का?
जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतल्यास बद्धकोष्ठता, किडनी स्टोन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.