तरुण वयात गुडघे-कंबर दुखते? वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी 'या' आयुर्वेदिक तेलाने करा मालिश
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, शारीरिक हलचालींचा अभाव, अपुरी झोप, पोषक तत्वांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे नेहमीच शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव आणि शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमकुवत होऊन जाते. त्यामुळे पोषक आहार, पुरेशी झोप आणि सतत आनंद राहून जीवन जगणे आवश्यक आहे. हल्ली कमी वयातच अनेकांना गुडघे दुखी किंवा कंबर दुखीची समस्या उद्भवू लागते. शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर किंवा हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्यानंतर गुडघे दुखी, सांधेदुखीच्या वेदना होऊ लागतात. यामुळे सतत गुडघ्यांमधून कटकट आवाज येऊ लागतो.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या २० व्या वर्षी कंबर दुखी किंवा पाठ दुखीची समस्या उद्भवू लागते. तर काहींना गुडघे दुखीमुळे खाली बसताना किंवा वर उठताना अनेक समस्यांनाचा सामना करावा लागतो., गुडघे दुखीची समस्या उद्भवल्यानंतर खाली बसताना किंवा वर उठताना वेदना होऊ लागतात. या वेदनांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला गुडघेच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या तेलाने नियमित मसाज करावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे वेदनांपासून आराम मिळेल.
तेल तयार करण्यासाठी राईचे तेल व्यवस्थित गरम करा. त्यानंतर त्यात ओवा, लवंग, कापूर, हळदी आणि मेथीचे दाणे घालून व्यवस्थित शिजवून घ्या. त्यानंतर तेल थंड करून बाटलीमध्ये भरून ठेवा. या तेलाने नियमित गुडघ्यांना मालिश करा. मालिश केल्यामुळे गुडघ्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखी आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून बनवलेले तेल प्रभावी ठरेल. राईच्या तेलात दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. या तेलाचा वापर केल्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी होते. याशिवाय सांध्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते. राईच्या तेलाचा वापर केल्यामुळे सांध्यांमध्ये वाढलेली लवचिकता सुधारते.
गुडघेदुखी म्हणजे काय?
गुडघेदुखी म्हणजे गुडघ्याच्या सांध्यामध्ये होणारा कोणताही त्रास किंवा वेदना.ही वेदना सांध्यांमध्ये उसण भरल्यासारखी किंवा तीव्र असू शकते.गुडघेदुखी विविध कारणांमुळे होऊ शकते.
गुडघेदुखीची लक्षणे कोणती?
गुडघ्यांमध्ये वेदना आणि कडकपणा, सूज आणि लालसरपणा, गुडघ्यातून आवाज येणे (उदा. कचकच आवाज), गुडघा वाकवण्यात किंवा सरळ करण्यात अडचण येणे.
गुडघेदुखी टाळण्यासाठी काय करावे?
वजन नियंत्रणात ठेवा, नियमित व्यायाम करा, गुडघ्याला विश्रांती द्या, भरपूर पाणी प्या, पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे.