आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयानक लक्षणे
दैनंदिन आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता, चुकीची जीवनशैली, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप आणि कामाच्या वाढलेल्या तणावामुळे अनेक लोक शरीराकडे दुर्लक्ष करतात. वाढत्या वयात शरीरात दिसणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे लहान आजार मोठे स्वरूप घेतात. जगभरात कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे लाखोंच्या संख्येने रुग्ण आहेत. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. जगभरात सगळीकडे आतड्यांच्या कॅन्सरची रुग्ण संख्या वाढली आहे. आतड्यांचा कॅन्सर कोणत्याही वयात होऊ शकतो.(फोटो सौजन्य – istock)
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर पोटात दुखणे, अपचन, गॅस किंवा जुलाब इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. ऍसिडिटी समजून अनेक लोक सतत दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे कॅन्सरच्या पेशींची शरीरात वाढ होऊ लागते आणि दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास दुर्लक्ष करू नये.
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शौचाच्या सवयीमध्ये अचानक बदल होऊ लागतो. यामुळे वारंवार शौचाला जावे लागणे, कॉन्स्टिपेशन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शौच झाल्यानंतरसुद्धा पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही. तुमच्या शरीरात हे बदल वारंवार दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करणे आवश्यक आहे.
कॅन्सर झाल्यानंतर शरीरात प्रामुख्याने दिसून येणारे गंभीर लक्षण म्हणजे शौचातून रक्त पडणे. बऱ्याचदा मूळव्याध झाल्यानंतरसुद्धा शौचातून रक्त पडते. अनेकदा थेट रक्त पडते तर काहीवेळा शौचात मिसळलते. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसू लागल्यास क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. वारंवार रक्त पडल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो.
जेवणानंतर घशात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? ‘या’ सवयी बदलून तात्काळ मिळवा आराम
आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर पोटात वारंवार वेदना होऊ लागतात. या वेदना कितीही उपाय केले तरीसुद्धा थांबत नाहीत. तीव्र वेदना वाढू लागल्यानंतर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. कॅन्सरमुळे आतड्यांमध्ये गाठी तयार होतात. या गाठी पचनसंस्थेमध्ये अडथळे निर्माण करतात. त्यामुळे गॅस किंवा अपचन होण्याची जास्त शक्यता असते.
कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे कोणती?
लक्षणे सुरुवातीच्या अवस्थेत दिसत नाहीत, पण जसजसा कर्करोग वाढतो, तसे मलत्यागाच्या सवयींमध्ये बदल, मलमध्ये रक्त येणे, पोटदुखी आणि वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
कोलोरेक्टल कर्करोगाचे निदान कसे केले जाते?
कोलोनोस्कोपी, बायोप्सी आणि रक्त चाचण्यांसारख्या तपासण्यांद्वारे या कर्करोगाचे निदान केले जाते.
कोलोरेक्टल कर्करोगाचा प्रतिबंध कसा करावा?
नियमित तपासण्या करणे, निरोगी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि धूम्रपान टाळणे यांसारख्या गोष्टींद्वारे कोलोरेक्टल कर्करोगाचा प्रतिबंध करता येतो.