रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे नष्ट करण्यासाठी 'हे' पदार्थ ठरतील प्रभावी
जगभरात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. सतत दुर्लक्ष केल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. हार्ट अटॅक येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळून येतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल. दैनंदिन आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. मात्र या लक्षणांकडे गांभीर्याने पहिले जात नाही.(फोटो सौजन्य – istock)
शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला पिवळा थर रक्तप्रवाहात अनेक अडथळे आणतो. यामुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. शरीराला व्यवस्थित रक्त पुरवठा न झाल्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. याशिवाय व्यवस्थित रक्तभिसरण न झाल्यामुळे थकवा वाढणे, अशक्तपणा इत्यादी अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. नैसर्गिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डार्क चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. डार्क चॉकलेट खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये नैसर्गिक फ्लेवोनॉइड्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. डार्क चॉकलेमध्ये ७०% पेक्षा जास्त प्रमाणात कोको असते. गोड चवीचे डार्क चॉकलेट खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात सुका मेव्याचे सेवन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, काळे मनुके, अक्रोड, अंजीर इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय गोड पदार्थ बनवताना सुका मेवा टाकला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते. रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हृदयाला आलेली सूज कमी करण्यासाठी सुका मेवा खावा.
रोजच्या आहारात नियमित वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आहारात सफरचंद, द्राक्ष, स्ट्रॉबेरी किंवा किवीचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी ही फळे प्रभावी ठरतात. फळांमधील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होऊ देत नाहीत.
अंघोळ करताना थंड की गरम पाणी वापरावे? जाणून घ्या शरीरासाठी कोणते पाणी आहे जास्त प्रभावी
सकाळच्या नाश्त्यात अनेक लोक एवोकॅडो सँडविच किंवा एवोकॅडोपासून बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. यामध्ये असलेले घटक हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. याशिवाय मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स रक्तात साचून राहिलेले वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करतात. हृदयाचे कार्य सुधारण्यासाठी एवोकॅडो फायदेशीर मानला जातो.
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे, जो आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होतो आणि काही पदार्थांमध्ये देखील आढळतो. तो पेशींच्या (cells) भिंती, काही हार्मोन्स आणि व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आवश्यक असतो.
उच्च कोलेस्ट्रॉल कसे तपासायचे?
रक्ताची तपासणी करून कोलेस्ट्रॉलची पातळी तपासली जाते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून रक्ताची तपासणी करून घेऊ शकता.
उच्च कोलेस्ट्रॉलची लक्षणे काय आहेत?
उच्च कोलेस्ट्रॉलची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात. म्हणूनच, नियमित आरोग्य तपासणी करणे महत्वाचे आहे.