लघवी करतात सतत जळजळ आणि वेदना होतात? मग 'या' पदार्थाचे सेवन करून तात्काळ मिळवा आराम
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये वारंवार लघवीला जावे लागते. बऱ्याचदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर सुद्धा महिला दुर्लक्ष करतात. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, शरीरात वाढलेला तणाव, तेलकट मसालेदार पदार्थांचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरसंबंधित उद्भवू लागलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.(फोटो सौजन्य – istock)
लघवीमध्ये वाढलेली जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी महिला अँटिबायोटिक औषधांचे सेवन करतात. यामुळे काहीवेळा पुरता आराम मिळतो. पण ,लघवीमध्ये दिसून येणारे इन्फेक्शन कायमच शरीरात तसेच टिकून राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लघवीमध्ये वाढलेली जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आहारात शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. त्यामुळे आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे.
लघवीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी काकडीचे सेवन करावे. यासोबतच काकडी खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. काकडीमध्ये असलेले पाणी शरीर कायमच हायड्रेट आणि निरोगी ठेवते. याशिवाय काकडीमधील गुणधर्म युरीनरी ट्रॅक्ट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तसेच काकडीमधील डिटॉक्सिफाइंग गुणधर्म मूत्राशयात साचलेले बॅक्टेरिया बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ ठेवतात.
विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये आढळून येणारे घटक शरीर आतून स्वच्छ करतात. याशिवाय सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी लिंबू पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ करतात. लिंबाच्या रसात असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात वाढलेली जळजळ कमी होते आणि आरोग्य सुधारते.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेले मध आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. मधाचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टरीयल गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीर कायमच स्वच्छ राहते. यासाठी कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. यामुळे युरीन इन्फेक्शन लवकर बरे होते आणि शरीराला आराम मिळतो.
UTI वर सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे क्रॅनबेरी. बेरीमध्ये असलेले गुणधर्म प्रोएंथोसायनिडिन्स बॅक्टेरिया युरीन मार्गात चिकटण्यापासून रोखतात. त्यामुळे आहारात क्रॅनबेरी किंवा इतर बेरीजचे सेवन करावे. रोजच्या आहारात नियमित क्रॅनबेरीचे सेवन केल्यास युरीन इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी क्रॅनबेरीचे सेवन करावे.