सांध्यांमधून सतत कटकट आवाज येतो? हाडांची लवचिकता वाढवण्यासाठी 'या' पदार्थाचे करा सेवन
पूर्वीच्या काळात सांध्यांमधील वेदना किंवा हाडांमधील वेदना वयाच्या साठीनंतर उद्भवू लागत होत्या. मात्र हल्ली बदलेल्या जीवनशैलीमुळे वयाच्या तिशीतच अनेकांना हाडे दुखणे, सांध्यांमधील वेदना, हाडांच्या वेदना वाढू लागतात. या वेदना वाढू लागल्यानंतर खाली बसताना, वर उठताना खूप जास्त त्रास होतो. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे किंवा शारीरिक हालचाली न केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेल्या या वेदना आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. बऱ्याचदा सांध्यांमधून कटकट आवाज येऊ लागतो. गुडघ्यांमधील ग्रीस म्हणजेच सांध्यामधील स्नेह द्रव कमी झाल्यानंतर ही समस्या उद्भवते.(फोटो सौजन्य – istock)
सांध्यांमधील ग्रीस कमी झाल्यानंतर हाडांसंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. बऱ्याचदा ही समस्या सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. या समस्येवर योग्य वेळी उपचार न झाल्यामुळे अर्धांगवायू, गठिया किंवा पूर्ण सांध्याचा नाश होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांध्यांमधील स्नेह द्रव कमी झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात आणि हे द्रव वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
सांध्यांमधील ग्रीस कमी झाल्यानंतर सांध्यांमधून सतत आवाज येणे, खाली बसताना किंवा वर उठताना हाड दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. बऱ्याचदा सांध्यांमधील हा आवाज कोणत्याही वेदनांशिवाय येतो. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे लक्ष देऊन योग्य वेळी उपचार केल्यास तातडीने आराम मिळेल.
बऱ्याचदा बाहेर कुठे गेल्यानंतर किंवा पायऱ्या चढल्यानंतर काहींनाच गुडघे दुखू लागतात. गुडघ्यांमध्ये वेदना वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. यामुळे गुडघ्यांमध्ये वाढलेल्या टोचणाऱ्या वेदना आणि कार्टिलेज घासण्यास सुरुवात होते. सांध्यांमधील ग्रीसची पातळी कोणत्याही वयात कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात निर्माण झालेल्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. गुडघ्यांना आलेली सूज कमी करण्यासाठी गरम पाण्याचा शेक घेतला जातो. मात्र हे उपाय काहीकाळापुरते प्रभावी ठरतात. त्यानंतर पुन्हा एकदा वेदना वाढू लागतात.
पोटात वारंवार गॅस होतो? जाणून घ्या या मागील प्रमुख कारण आणि घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम
सांध्यांमधील ग्रीस कायम टिकवून ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त अन्न, दूध, नारळ पाणी, नट्स इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे सांध्यांमधील वेदना कमी होतात आणि गुडघे दुखीची समस्या उद्भवत नाही. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे सांध्यांमध्ये आवश्यक ल्युब्रिकेशन मिळते, ज्यामुळे वेदना कमी होतात.