वयाच्या साठीत येईल चेहऱ्यावर चमकदार ग्लो! सकाळी नियमित खा 'ही' फळे
वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्वचेवर आलेल्या सुरकुत्या, काळे डाग, पिंपल्स किंवा शरीरसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य प्रसाधनांचा करतात. याशिवाय वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट, मेकअप इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या किंवा इतर समस्या कमी करण्यासाठी मेकअप केले जाते. मात्र मेकअप केल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होत नाही तर काहीवेळा आणखीनच वाढू लागतात. त्यामुळे दीर्घकाळ त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या ताज्या फळांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चमकदार त्वचेसाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – pinterest)
किमतीने महाग असलेले किवी हे फळ खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे त्वचेच्या सौंदर्यत वाढ होते. किवीमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते. ज्यामुळे त्वचेतील कोलेजन निर्मिती वाढते. त्वचेमधील कोलेजन त्वचा घट्ट ठेवण्यास आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे आहारात किवी खाल्यामुळे त्वचेवरील काळेपणा आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. फ्रुट सॅलड बनवताना त्यात तुम्ही किवी टाकू शकता.
बाजारात काळी द्राक्ष हिवाळ्याच्या दिवसांमध्ये उपलब्ध असतात. काळ्या द्राक्षांचे सेवन करणे अनेकांना आवडत नाही. कारण या द्राक्षांची साल चवीला तुरट लागते. पण आरोग्यासाठी हीच द्राक्ष गुणकारी आहेत. काळ्या द्राक्षांमध्ये आढळून येणारे रेसव्हेराट्रॉल हे अँटी-एजिंग कंपाउंड त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. तसेच त्वचेवर आलेले इन्फेक्शन, रॅश किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी काळी द्राक्ष खावीत. रेसव्हेराट्रॉलमुळे त्वचेमधील पेशींचे रक्षण होते.
विटामिन सी युक्त पपई खाल्यामुळे पचनक्रिया सुधारते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पपई खावी. यामधील एंजाइम त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्वचेवर वाढलेले पिगमेंटेशन कमी करण्यासाठी पपई खावी. यासोबतच उपाशी पोटी पपईचे सेवन केल्यामुळे त्वचा अधिक उठावदार आणि सुंदर होते.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. चवीला आंबटगोड स्ट्रॉबेरी आरोग्य आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी खाल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. त्वचेवर वाढलेल्या सुरकुत्या आणि इतर समस्या दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी खावी. चेहऱ्यावर वाढलेल्या बारीक रेषा कमी करण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे.