आरोग्यासंबंधित उद्भवू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका
बदलत्या ऋतूनुसार शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र सतत दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचू शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम तळपायांवर लगेच दिसून येतो. शरीरातील उष्णता वाढल्यानंतर तळपायांमध्ये परिणाम दिसू लागतो. तळपायांमध्ये वेदना होणे किंवा तळपायांमध्ये सतत आग होऊ लागते. या वेदना अधिककाळ तशाच राहिल्यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचू लागते. तळपायांमध्ये सतत आग होण्यास सुरुवात झाल्यानंतर बाम लावणे किंवा पाय दाबले जातात. मात्र हे उपाय करून काही वेळापुरता आराम मिळतो. पण त्यानंतर पुन्हा एकदा तळपायांमध्ये आग होऊ लागते.(फोटो सौजन्य – iStock)
रोजच्या या 5 चुका तुम्हाला वेळेआधीच करतात वृद्ध, आजच या सवयी बदला नाहीतर पश्चातापाची वेळ येईल
तळपायांमध्ये वाढलेली उष्णता आणि वेदना बऱ्याचदा लवकर बऱ्या होत नाहीत. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. मात्र यामुळे तात्काळ आराम मिळत नाही. तळपायांमध्ये होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये, कारण या वेदना मोठ्या आजारांचे संकेत दर्शवतात. शरीराच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर किंवा विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर तळपायांमध्ये आग होऊ लागते.
वारंवार तळपायांमध्ये आग होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक घरगुती उपाय करून आराम मिळवतात. पण यामुळे फारसा आराम मिळत नाही. शरीराचे मज्जातंतू डॅमेज झाल्यानंतर शरीरात असे अनेक बदल दिसून येतात. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर तळपायांमध्ये आग होऊ लागते. शरीरात वाढलेल्या खरेच्या प्रमाणामुळे आरोग्याच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे पायांमध्ये सुन्नपणा जाणवणे किंवा जळजळ वाढू लागते.
त्वचेमधील इन्फेक्शनचा धोका वाढू लागल्यामुळे पायांमध्ये जळजळ होऊ लागते. त्वचेला इन्फेशन झाल्यानंतर शरीराला वारंवार घाम येऊ लागतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. यामुळे पायांना खूप जास्त खाज येणे किंवा पायांमध्ये जळजळ वाढू लागते. ज्यामुळे तुम्ही पायांमध्ये मोजे घालता तेव्हा इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते.
एकाच जागेवर जास्त वेळ उभं राहिल्यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. यामुळे पायांमध्ये वेदना होणे, जळजळ इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. जास्त वेळ उभं राहिल्यामुळे पायांमध्ये जळजळ होऊ लागते. चुकीच्या पद्धतीने पायांमध्ये मोजे घातल्यास पायांच्या रक्तप्रवाहात अनेक अडचणी निर्माण होतात.