
लघवी करताना कायमच जळजळ- वेदना होतात ? जाणून घ्या यामागील कारणे आणि घरगुती उपाय
दिवसभरात खाल्लेल्या अन्नपदार्थांचा, पाण्याचा आणि इतर सर्वच गोष्टींचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करून शरीराची काळजी घेणे फारच आवश्यक आहे. शरीरातील विषारी घटक लघवीवाटे, घामावाटे आणि शौचावाटे बाहेर पडून जातात. पण बऱ्याचदा लघवी करताना कायमच जळजळ, वेदना जाणवता. किडनी शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. पण शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा पोषक घटकांच्या अभावामुळे लघवीसंबंधित समस्या उद्भवतात. लघवीसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर दुर्लक्ष करून टाळाटाळ केली जाते. पण असे केल्यामुळे इन्फेक्शन आणि किडनीचा आजार वाढतो आणि संपूर्ण आरोग्य बिघडते. शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून महिला स्वतःच्या आरोग्याची पूर्णपणे वाट लावून घेतात.(फोटो सौजन्य – istock)
महिलांसह पुरुषांना सुद्धा लघवीसंबंधित समस्या उद्भवतात. लघवी करताना उद्भवणाऱ्या समस्यांकडे सतत दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. लघवीसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर महिला डॉक्टरांकडे जाण्यास संकोच निर्माण होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लघवी करताना सतत जळजळ का होते? लघवीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यास लघवीसंबंधित समस्या कायमच्या दूर होतील आणि तुम्ही निरोगी राहाल.
लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे न करता शरीराची काळजी घ्यावी. लघवीमध्ये वाढलेल्या वेदना किंवा जळजळ हा मेडिकल भाषेत डिस्यूरिया असे म्हणतात. ही समस्या नाजूक अवयवांमधील बॅक्टरीयामुळे होते. लघवीमध्ये वाढलेली जळजळ प्रामुख्याने २० ते ५० वयोगटातील महिलांमध्ये दिसून येते. लाघवीमार्गातील संसर्ग अस्वच्छतेमुळे होते. मूत्र मार्गाच्या माध्यमातून बॅक्टेरिया यूरिनरी सिस्टीम आणि ब्लॅडरपर्यंत पसरतात. ज्यामुळे लघवीमधून दुर्गंधी येणे, लघवी करताना जळजळ, पुन्हा-पुन्हा लघवी पास होणे, लघवीसोबत रक्त येणे, छाती किंवा कंबरेमध्ये वेदना होणे किंवा काहींना खूप जास्त ताप सुद्धा येतो.
लघवीसंबंधित समस्या केवळ इन्फेक्शनमुळे नाहीतर किडनी स्टोन झाल्यानंतर सुद्धा होतात. किडनी स्टोन झाल्यानंतर कॅल्शियमयुक्त घटक किडनीमध्ये तसेच साचून राहतात. यूरिनरी सिस्टीममध्ये स्टोन झाल्यास पुन्हा पुन्हा लघवी येणे, लघवीचा रंग, भुरका, गुलाबी दिसणे, मूड चांगला नसणे, उलटी होणे, पाठीदुखी होणे, ताप येणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरात दिसून येणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
लठ्ठपणाशी झुंजणाऱ्या व्यावसायिकांसाठी सेमाग्लुटाइड उपचार प्रभावी !जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती
लघवीच्या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सर्वप्रथम, रोजच्या आहारात भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पाण्याचे सेवन करावे. तसेच लघवीच्या समस्या कमी करण्यासाठी नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्यात असलेले घटक शरीर स्वच्छ करतात आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय आहारात दूध, दही, ताक, थंड पदार्थ, फळे इत्यादींचे सेवन करावे.
युरिन इन्फेक्शन म्हणजे काय?
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) ही एक अशी स्थिती आहे जिथे मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात जसे की मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग किंवा मूत्रवाहिनीमध्ये जंतूंचा संसर्ग होतो.
UTI चे सर्वात सामान्य कारण काय आहे?
बर्याच प्रकरणांमध्ये, E. coli नावाच्या बॅक्टेरियामुळे हा संसर्ग होतो.
UTI कोणाला होऊ शकतो?
पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये मूत्रसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते, तरीही तो कोणत्याही वयोगटातील आणि लिंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो.