युरीन इन्फेक्शनमुळे त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूमध्ये युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. शरीरात वाढलेली उष्णता किंवा आरोग्यासंबंधित इतर अनेक आजारांमुळे युरीन इन्फेक्शनचा धोका वाढतो. यूरिन इन्फेक्शन किंवा यूटीआयची समस्या उद्भवल्यानंतर लघवी करताना वेदना होणे, जळजळ होणे, लघवीचा रंग बदनले किंवा इतरही समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय काहींना थोड्या थोड्या वेळाने लघवीला जावे लागते. लघवीमधील इन्फेशन वाढल्यानंतर बऱ्याचदा ताप किंवा अंग दुखी इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला युरीन इन्फेक्शनपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास लघवीसंबंधित वाढलेल्या समस्या लगेच दूर होतील आणि आराम मिळेल. चला तयार जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
लघवीमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी अनेक लोक मेडिकल मधील गोळ्यांचे सेवन करतात. मात्र या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने अॅंटीबायोटिक्स गोळ्यांचे सेवन करावे. पण वारंवार तुम्हाला जर लघवीमधील इन्फेक्शन होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करूनसुद्धा आराम मिळवू शकता. घरगुती उपाय केल्यास शरीरात वाढलेले हानिकारक विषाणू बाहेर पडून जातील आणि आराम मिळेल.
लघवीमधील इन्फेक्शन कमी करण्यासाठी धण्याचं पाणी प्यावे.धण्याच्या बियांमध्ये डिटॉक्सिफाइंग गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म लघवीमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी करतात. यासाठी टोपात पाणी गरम करून त्यात १ चमचा धणे टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. धणे टाकलेल्या पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून थंड करा. हे पाणी नियमित प्यायल्यास लघवीमध्ये वाढलेले इन्फेक्शन कमी होईल आणि आराम मिळेल. धण्याचे पाणी दिवसभरातून दोन किंवा तीन वेळा प्यावे. यामुळे लघवीमध्ये वाढलेली जळजळ आणि वेदना कमी होतील.
आरोग्यासाठी कोरफड आणि आवळा अतिशय गुणकारी आहे. विटामिन सी युक्त आवळ्याचे नियमित आहारात सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. हे दोन्ही पदार्थ एकत्र मिक्स करून खाल्यास मूत्राशय मजबूत होण्यास मदत होते. मिक्सरच्या भांड्यात कोरफड गर, आवळ्याची पावडर, काकडी आणि पुदिन्याची पाने घालून बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेले मिश्रण गाळून घ्या आणि सेवन करा. यामुळे शरीराच्या आतील भागांमध्ये आलेली सूज कमी होईल आणि जळजळ, वेदनांपासून आराम मिळेल.
UTI ची लक्षणे काय आहेत?
वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, ओटीपोटात किंवा पाठीच्या खालील भागात वेदना, लघवीचा रंग बदलणे किंवा त्याला वास येणे, ताप येणे.
UTI टाळण्यासाठी काय करावे?
हायड्रेटेड राहा. भरपूर पाणी प्यालघवी धरून ठेवू नका. जेव्हा लघवीला येते तेव्हा ती लगेच करा.
UTI झाल्यावर काय खाऊ नये?
कॅफीनयुक्त पेये, अल्कोहोल आणि जास्त मसालेदार पदार्थ टाळा.