रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल एका झटक्यात होईल नष्ट! नियमित करा 'या' बारीक बियांचे सेवन, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी
हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शरीरात होणाऱ्या बदलांचा आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव, झोपेचा अभाव, शारीरिक हालचाली, पाण्याचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तात खराब कोलेस्ट्रॉल साचून राहते. रक्तात साचून राहिलेल्या चरबीमुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. रक्तप्रवाहात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे शरीराला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ज्यामुळे हृदयावर जास्तीचा तणाव येतो. खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हृदयावर ताण येतो.(फोटो सौजन्य – istock)
हार्ट अटॅक हा सायलेंट किलर आजार आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा स्टोक येऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे जीवनशैलीतील चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करून शरीराची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी कोणत्या बियांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बियांच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहील आणि शरीराला अनेक फायदेसुद्धा होतील.
जवस बिया शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. या बियांच्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहते. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, फायबर आणि लिग्नान्स इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या घटकांमुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नष्ट होऊन जाते. जवसाच्या बियांमध्ये सहज विरघळून जाणारे फायबर असतात. त्यामुळे सकाळी एक चमचा भाजलेले किंवा कुटलेले जवस दही, ओट्स किंवा स्मूदीमध्ये मिक्स करून खावेत.
सकाळी उठल्यानंतर अनेक लोक कोमट पाण्यात चिया सीड्स मिक्स करून पितात. यामुळे शरीरावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. याशिवाय चिया सीड्स मध्ये असलेल्या घटकांमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. चिया सीड्स पाण्यात भिजवल्यानंतर जेल सारख्या दिसतात. त्यातील जेलसदृश थर कोलेस्ट्रॉल शोषण कमी करतात, ज्यामुळे रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होते. चिया सीड्सचे सेवन केल्यामुळे एलडीएल कमी होतो, ट्रायग्लिसराइड्स घटते आणि लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया चवीला अतिशय सुंदर लागतात. या बियांमध्ये मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि हृदयाच्या कार्यात अडथळे येत नाहीत. भोपळ्याच्या बिया तुम्ही सॅलड, ओट्स किंवा सूपमध्ये मिक्स करून खाऊ शकता. नियमित मूठभर भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होईल.
World Brain Stroke Day: ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ब्रेन स्ट्रोकपासून वाचवतील, तज्ज्ञांकडून दिलासा
कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?
कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असतो. हे शरीराला हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि अन्न पचवण्यासाठी आवश्यक असते.
उच्च कोलेस्ट्रॉलची कारणे आणि परिणाम:
खराब आहार, नियमित व्यायामाचा अभाव, धूम्रपान, लठ्ठपणा आणि आनुवंशिकता उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये योगदान देऊ शकतात. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होऊ शकतात (याला ‘प्लेक’ म्हणतात). जर हा प्लेक फुटला तर रक्ताची गुठळी तयार होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल चाचणी:
तुम्ही नियमित रक्त तपासणीद्वारे तुमची कोलेस्ट्रॉल पातळी तपासू शकता.डॉक्टर तुमच्या कोलेस्ट्रॉलच्या पातळीनुसार उपचारांचा सल्ला देतील.






