झोपेतून उठल्यानंतर कायमच चक्कर येते? मग आरोग्यासंबंधित 'या' गंभीर आजाराची असू शकतात लक्षणे
दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर शरीराला विश्रांतीची खूप जास्त आवश्यकता असते. कारण सतत काम, मानसिक तणाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य बिघडते. शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी जशी पोषक घटकांची आवश्यकता असते, तशीच झोपेची सुद्धा आवश्यकता असते. ७ ते ८ तासांची शांत झोप घेतल्यामुळे आरोग्य सुधारते. पण बऱ्याचदा काहींना झोपेतून उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे वाटते. झोपेतून उठल्यानंतर डोळ्यांसमोर अचानक अंधार येतो. याशिवाय अंथरुणातून उठल्यानंतर सुद्धा खूप जास्त अस्वस्थपणा जाणवू लागतो. ही समस्या काहींना अतिशय सामान्य वाटते. पण वारंवार झोपेतून उठल्यानंतर झोप डोकं दुखत असेल किंवा जडपणा वाटत असेल तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
अपुऱ्या झोपेमुळे किंवा रात्रीच्या थकव्यामुळे सुद्धा झोपेतून उठल्यानंतर डोकं दुखत. पण झोपेतून उठल्यानंतर वारंवार डोकेदुखीची समस्या उद्भवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. हा त्रास कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सतत येणारी कोणत्या आजाराचे संकेत असू शकते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. डॉक्टरांच्या मते, झोपेतून उठल्यानंतर अचानक चक्कर येणे किंवा डोके दुखी वाढण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असे म्हणतात. यामध्ये काहीवेळा दृष्टी अंधुक होणे, अशक्तपणा, बेशुद्ध इत्यादी लक्षणे दिसून येतात.
शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर चक्कर येणे, डोकं दुखणे किंवा डोळ्यां समोर अचानक काळोख येतो. डिहायड्रेशन झाल्यानंतर शरीराचा रक्तदाब अतिशय कमी होऊन जातो. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीराचा रक्तदाब अचानक कमी होऊन जातो आणि हृदयावर तणाव येण्याची शक्यता असते.
जर तुम्ही आरोग्यासंबंधित कोणत्याही आजाराची औषध सतत खात असाल तर औषधांच्या दुष्परिणामांमुळे वारंवार थकवा, अशक्तपणा किंवा झोपेतून उठल्यानंतर चक्कर येऊ शकते. हृदयरोग किंवा रक्तदाबाच्या औषधांचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. यामुळे काहीवेळा रक्तदाब कमी जास्त होण्याची शक्यता असते.
शरीरातील लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यानंतर अशक्तपणा, थकवा, चक्कर जाणवू लागते. वारंवार येणाऱ्या चक्कर, अशक्तपणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. याशिवाय चक्कर आल्यास साखर पाणी किंवा लिंबू पाण्याचे सेवन करावे. मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे सतत चक्कर येते.
तुम्ही जर कायमच अल्कोहोल आणि स्मोकिंग खूप जास्त प्रमाणात करत असाल तर तुम्हाला चक्कर येऊ शकते. याशिवाय डोळ्यांसमोर अंधार येऊन चक्कर आल्यासारखे वाटते. अल्कोहोलचे अतिसेवन केल्यामुळे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनचा धोका वाढतो.
सकाळच्या चक्करची कारणे:
झोपेतून अचानक उठल्यावर रक्तदाब कमी झाल्यामुळे डोके हलके वाटू शकते किंवा चक्कर येऊ शकते. ही एक कान-संबंधित समस्या आहे ज्यामुळे डोके फिरल्यासारखे वाटते, विशेषतः झोपेतून उठताना किंवा अंथरुणावर वळताना.
डोकेदुखीचे सामान्य प्रकार:
सायनसमध्ये संसर्ग किंवा जळजळीमुळे ही डोकेदुखी होते. डोकेदुखी डोक्याच्या एका बाजूला तीक्ष्ण वेदना म्हणून येते, जी दररोज एकाच वेळी होऊ शकते.
डोके दुखीवर घरगुती उपाय:
शांत, अंधाऱ्या खोलीत आराम करणे.डोक्यावर किंवा मानेवर गरम किंवा थंड दाबणे.डोके आणि मानेला मालिश करणे.थोड्या प्रमाणात कॅफिनचे सेवन करणे.आयबुप्रोफेन, अॅसिटामिनोफेन, किंवा अॅस्पिरिन सारखी ओव्हर-द-काउंटर औषधे घेणे.