गरबा खेळताना महिलेचा दुर्दैवी अंत! हार्ट अटॅक येण्याच्या काही मिनिट आधी शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
जगभरात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काहीदिवस आधी शरीरात अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू होतो. अशीच एक घटना वसईमध्ये घडली. देशभरात सगळीकडे नवरात्री उत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक ठिकाणी गरबा, दांडियाची आयोजन केले जाते. पण गरबा खेळण्यास गेलेल्या ४६ वर्षीय महिलेचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटका येऊन महिला जागीच खाली कोसळली. त्यामुळे हल्ली कोणत्याही वयातील व्यक्तीला हार्ट अटॅक येऊ शकतो. हार्ट अटॅक केवळ वृद्धांचा नाहीतर तरुण, मध्यमवयीन लोकांमध्ये सुद्धा दिसून येत आहे.(फोटो सौजन्य – istock)
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शारीरिक हालचालींचा अभाव, कामाचा तणाव, पाण्याची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, पचनाची समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक येण्यामागील प्रमुख कारण आहे. कोलेस्ट्रॉल हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे काहीवेळा श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या काही मिनिट आधी शरीरात कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
हार्ट अटॅक येण्याच्या काही महिने आधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस आधी छातीत जडपणा, जबड्यापासून खाली डावा हात दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अचानक चक्कर येणे, अशक्तपणा, थकवा इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. याशिवाय काहीवेळा घाम येणे, उलट्या, चक्कर इत्यादी लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
जिममध्ये जाऊन व्यायाम, गरबा किंवा इतर कोणत्याही शारीरिक हालचाली करताना शरीराची खूप जास्त ऊर्जा खर्च होते. ज्यावेळी हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नाही. याशिवाय आधीपासून हार्ट ब्लॉकेज, उच्च रक्तदाब किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवल्या असतील तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. वयाच्या ४० वर्षानंतर मधुमेह, लठ्ठपणा किंवा वाढते कोलेस्ट्रॉल इत्यादी समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.
हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख कारणे:
धूम्रपान, लठ्ठपणा, शारीरिक हालचालींचा अभाव आणि अस्वास्थ्यकर आहार. रक्तातील साखरेची आणि चरबीची उच्च पातळी हृदयविकाराचा धोका वाढवते.
हृदयविकाराची प्रमुख कारणे:
हे हृदयविकाराचे सर्वात सामान्य कारण आहे. धमन्यांच्या आत चरबी, कोलेस्ट्रॉल आणि इतर पदार्थ साचल्याने ‘प्लाक्स’ (Plaques) तयार होतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही.