पोटात वाढलेल्या गॅसमुळे सतत जडपणा जाणवतो? मग 'हे' उपाय करून कायमचा मिळवा आराम
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, चुकीच्या वेळी जेवण, तिखट तेलकट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे अपचन, गॅस आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे संपूर्ण दिवस तणावात जातो. कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहारात कायमच सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या वाढल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण असे न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा. आज आम्ही तुम्हाला पोटात वाढलेला गॅस कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे शरीरातील गॅस कमी होईल.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार तुमच्या पोटात जर गॅस होत असेल तर आहारात बदल करणे गरजेचे आहे. शरीरात वाढलेल्या गॅसमुळे पोटात दुखणे किंवा इतर अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी आहारात नारळ पाणी, लिंबू पाणी, दही-ताक इत्यादी थंड पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीर कायमच निरोगी राहील आणि आरोग्याला अनेक फायदे होतील. पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
दैनंदिन आहारात चुकीच्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. आहारात बीन्स, डाळी, ब्रोकली, फुलकोबी इत्यादी भाज्या खाणे टाळावे. या भाज्यांच्या सेवनामुळे पोटात गॅस वाढतो आणि आरोग्याला हानी पोहचते. कायम निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या आणि फळभाज्यांचे सेवन करावे. यामुळे शरीर निरोगी राहते.
अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. यामुळे अन्नपदार्थ सहज पचन होत नाही. अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी शारीरिक हालचाली करणे आवश्यक आहे. नियमित व्यायाम किंवा ध्यान केल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीर कायमच फिट राहते. जेवल्यानंतर २ किंवा तीन तासांनी झोपावे.
पित्ताशयात खडे झाल्यास आहारात चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचा सेवन, पोटात वाढतील तीव्र वेदना
गॅसची सामान्य लक्षणे काय आहेत?
जेवताना किंवा जेवणानंतर ढेकर येणे सामान्य आहे.पोटात वायू जमा झाल्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटते.पोटात अस्वस्थता किंवा दुखणे जाणवणे.
गॅस कमी करण्यासाठी काय करावे?
मसालेदार आणि चरबीयुक्त पदार्थ कमी खा. कार्बोनेटेड पेये पिणे टाळा. जेवण हळू आणि चावून खा, जेणेकरून जास्त हवा पोटात जाणार नाही.
गॅस गंभीर आहे का?
काही प्रमाणात गॅस होणे सामान्य आहे, पण जर तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्हाला छातीत दुखत असेल, तर ते गॅसमुळे आहे असे समजू नका. हृदयाशी संबंधित समस्यांसाठी त्वरित वैद्यकीय मदत घ्या.