Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा

शरीरात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी ओव्याच्या काढ्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यासोबतच ओवा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. जाणून घ्या ओव्याचा काढा बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 28, 2025 | 05:30 AM
आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा

Follow Us
Close
Follow Us:

पोट स्वच्छ करण्यासाठी कोणता पदार्थ खावा?
ओव्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
ओव्याचा काढा बनवण्याची सोपी कृती?

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. सतत मसालेदार, अतितेलकट आणि जंक फूडचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी आणि इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. बऱ्याचदा अपुऱ्या झोपेमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात गॅस, ऍसिडिटी आणि अपचन होते. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा इत्यादी गंभीर समस्या वाढून शरीराचे नुकसान होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर ओव्याच्या काढ्याचे सेवन कशी करावे? ओव्याचा काढा बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. प्रत्येक घरात ओवा असतोच. ओव्याचे सेवन केल्यामुळे पोटात वाढलेल्या वेदना आणि अपचनाच्या समस्या कमी होऊन आराम मिळतो.(फोटो सौजन्य – istock)

Winter Health Problem: हिवाळ्यातील गुडघेदुखी काय आहेत कारणं, लक्षणं आणि उपचार

ओव्याचा काढा, भाजलेला ओवा इत्यादी कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्ही ओव्याचे सेवन करू शकता. ओव्यामध्ये थायमॉल, कॅर्व्हाक्रोल, फ्लॅव्होनॉइड्स, विटामिन ए, विटामिन बी -कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि तंतुमय घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ओवा चावून खाल्ल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जाईल. ओव्यामध्ये असलेल्या घटकांमुळे आतड्यांना आलेली सूज आलेली सूज कमी होण्यास मदत होते. हा पदार्थ बुरशीजन्य रोगांपासून सुटका मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरतो. पोटात वाढलेल्या वेदना शांत करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे.

काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात एक चमचा ओवा घालून उकळी येण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी येऊन टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेले पाणी गाळून त्यात मध मिक्स करून प्यावे. यामुळे अपचन, आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस आणि पचनाच्या सर्वच समस्यांपासून कायमचा आराम मिळेल. जेवल्यानंतर काहींना पोटात जडपणा जाणवू लागतो. पोटात वाढलेल्या जडपणामुळे व्यवस्थित झोप सुद्धा लागत नाही. अशावेळी चिमूटभर ओवा गरम पाण्यासोबत खाल्ल्यास लगेच आराम मिळेल. थंडीच्या दिवसांमध्ये पोटात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी ओव्याचे सेवन करावे.

तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ओटीपोटात किंवा पोटात खूप जास्त वेदना होतात. या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी ओव्याचे सेवन करावे. तसेच सर्दी, खोकला आणि कफाची समस्या कमी करण्यासाठी ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. ओव्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी गूळ किंवा मधाचा वापर करावा. यामध्ये असलेल्या थायमॉलमुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि तुम्ही कायमच निरोगी राहाल. ऍसिडिटी, छातीत वाढलेली जळजळ, आंबट ढेकर, अन्ननलिकेमध्ये जमा झालेले पित्त कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठतेची सामान्य कारणे?

    Ans: फळे, भाज्या आणि धान्यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी असणे.

  • Que: बद्धकोष्ठता टाळण्यासाठी उपाय?

    Ans: आहारात फायबरचे प्रमाण वाढवा, जसे की फळे, भाज्या आणि पूर्ण धान्यांचा समावेश करा.

  • Que: ऍसिडिटीसाठी घरगुती उपाय?

    Ans: आले चघळल्याने किंवा आल्याचा चहा प्यायल्याने पोटातील आम्ल नियंत्रित होते आणि पचन सुधारते.

Web Title: Constantly feeling heavy in the stomach due to rotting dirt in the intestines then after waking up in the morning drink ova regularly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • constipation
  • home remedies

संबंधित बातम्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला द्या नैसर्गिक ओलावा! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल चमकदार आणि तेजस्वी
1

हिवाळ्यात कोरड्या त्वचेला द्या नैसर्गिक ओलावा! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल चमकदार आणि तेजस्वी

चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग होतील कायमचे गायब! १५ दिवस नियमित त्वचेवर लावा ‘हा’ प्रभावी लेप, चेहरा दिसेल देखणा
2

चेहऱ्यावरील पिंपल्सचे काळे डाग होतील कायमचे गायब! १५ दिवस नियमित त्वचेवर लावा ‘हा’ प्रभावी लेप, चेहरा दिसेल देखणा

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? मग मोहरीच्या तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, मुळांपासून केस होतील चमकदार
3

तरुण वयात केस पांढरे झाले आहेत? मग मोहरीच्या तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, मुळांपासून केस होतील चमकदार

पित्त वाढल्यामुळे अंगावर लाल चट्टे येतात? मग आहारात करा ‘हे’ साधे बदल, पचनक्रिया राहील कायमच मजबूत- निरोगी
4

पित्त वाढल्यामुळे अंगावर लाल चट्टे येतात? मग आहारात करा ‘हे’ साधे बदल, पचनक्रिया राहील कायमच मजबूत- निरोगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.