तरुणींमध्ये वाढतोय स्तनाच्या कर्करोगाचा धोका! शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे चुकूनही करा नका दुर्लक्ष
कोणत्या वयात स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यता असते?
स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे?
स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?
जगभरात मागील काही वर्षांपासून कॅन्सरच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावा. चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात सातत्याने काहींना काही बदल जाणवत असतात. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे कायमच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
पुण्यातील तरुण महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. पुणे पॉप्युलेशन-बेस्ड कॅन्सर रजिस्ट्री (पीबीसीआर) आणि एमओसी कॅन्सर केअर सेंटरने केलेल्या पाहणीनुसार ३० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये ही व्याधी वेगाने पसरत आहे. यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अहवालानुसार, पुण्यात एक लाख महिलांमागे स्तनाचा कर्करोग वय-समायोजित स्तनाचा होण्याचा प्रादुभर्भाव दर (एएआर) ८३.० इतका नोंदवला गेला आहे. या आकडेवारीनुसार कर्करोग हा पुण्यातील महिलांत सर्वांत जास्त आढळणारा कर्करोग असल्याचे अधोरेखित झाले आहे. एमओसी कॅन्सर केअर सेंटरमध्येही गेल्या काही वर्षात ३० ते ४० वयोगटातील रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे.
निष्क्रय जीवनशैली, अनियमित व फास्टफूडयुक्त आहार, मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, वाढती लठ्ठपणा, आनुवंशिक जोखीम ही प्रमुख कारणे तज्ज्ञांच्या मते, लवकर लग्न न करणे किंवा गर्भधारणा उशिरा. याशिवाय लक्षणे दिसूनही तपासणी न केल्याने उशिरा निदान हेदेखील कारणीभूत.
पूर्वी ही व्यथा ५० वर्षांवरील महिलांमध्ये होती, पण आता तरुण वयातही ती आक्रमक स्वरूपात दिसत आहे. नियमित स्व-तपासणी, चाळिशीनंतर दरवर्षी मॅमोग्राफी आणि निरोगी जीवनशैली अंगिकारल्यास धोक्याचे प्रमाण कमी होऊ शकते. लवकर निदान झाल्यास यशस्वी उपचाराचे प्रमाण ९०% पेक्षा जास्त असते.
Ans: स्तन किंवा काखेत गाठ किंवा कडकपणा, स्तनाचा आकार किंवा स्वरूप बदलणे.
Ans: कर्करोगाच्या पेशी काढून टाकण्यासाठी.
Ans: स्तनाचा कर्करोग उपचार करण्यायोग्य असतो आणि जगण्याची शक्यता जास्त असते.






