Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ‘हे’ फायबरयुक्त पदार्थ, बद्धकोष्ठता होईल दूर

मूळव्याध आणि बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे आतडे स्वच्छ राहतात आणि आरोग्य सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 08:59 AM
मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा 'हे' फायबरयुक्त पदार्थ

मूळव्याध होईल मुळांपासून नष्ट! आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा 'हे' फायबरयुक्त पदार्थ

Follow Us
Follow Us:

मूळव्याध म्हणजे काय?
मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी काय खावे?

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा आहारात अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण सतत तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध वाढण्याची जास्त शक्यता असते. बद्धकोष्ठता झाल्यानंतर आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे गॅस, अपचन आणि पचनाच्या इतर समस्या उद्भवतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरतात. मूळव्याध हा बद्धकोष्ठतेमुळे उद्भवणारा गंभीर आजार आहे. पोट स्वच्छ न झाल्यामुळे किंवा शौचाच्या वेळी खूप जास्त जोर लावल्यामुळे मूळव्याध होतो. यामुळे गुदद्वाराच्या भागातील नसांना सूज येते. तसेच या नसांवर जास्तीचा तणाव आल्यामुळे रक्तस्त्राव आणि वेदना होण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य – istock/AI)

हार्ट अटॅकच्या धोक्याला कमी करतात ‘हे’ सुपरफूड, नॅचरली वाढवतात गुड कोलेस्ट्रॉल

कमी पाण्याचे सेवन, तिखट पदार्थांचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडून जाते. मूळव्याध हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. एका जागी तासनतास बसून राहणे, शौचास बसल्यावर जास्त जोर लावणे इत्यादी कारणांमुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो तर काहीवेळा रक्तस्त्राव होण्याची जास्त शक्यता असते. मूळव्याध हा सायलेंट किलर आजार आहे. मूळव्याध झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आतडे स्वच्छ करण्यासाठी कोणत्या फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे, चला तर जाणून घेऊया सविस्तर.

मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • शौचाच्या वेळी होणार रक्तस्त्राव
  • वेदना न होता खाज येणे
  • शौचाच्या जागी गाठ किंवा कोंब जाणवतो
  • बसताना त्रास होणे
  • जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमी होऊन अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता
  • सतत थकवा आणि चक्कर येणे
  • मूळव्याध वाढल्या मानसिक आरोग्यावर परिणाम
  • गुदद्वाराच्या भागात जखमा

मूळव्याध कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन:

आतडे स्वच्छ ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. मूळव्याध झाल्यानंतर नियमित भरपूर पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमधील मल मऊ होतो आणि शरीरातील घाण सहज बाहेर पडून जाते. शौचाला बसल्यानंतर जास्त वेळ बसू नये. दैनंदिन आहारात ओट्स, नाचणी, हिरव्या पालेभाज्या, फळे (सफरचंद, पेर), सॅलड, ताक इत्यादी पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. हे पदार्थ सहज पचन होतात आणि आतड्यांमधील घाण बाहेर काढून टाकण्यास मदत करतात. मुळव्याधाची समस्या वाढल्यास वेळीच औषध उपचार करावेत, अन्यथा गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

वाढत्या वजनाची चिंता सोडा! डायट-वर्कआउट करून घाम गाळायची गरज नाही, झोपेतच बर्न होईल फॅट; आजपासूनच करा हे बदल

वारंवार मूळव्याध किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत असेल तर चिकन, मटण इत्यादी उष्ण पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. चिकन मटण पचवण्यासाठी आतड्याना जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित नसाल तर चिकन मटण सहज पचन होणार नाही. सतत अपचन झाल्यामुळे आणि पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. वाढत्या बद्धकोष्ठतेमुळे पुढे जाऊन मुळव्याधासारखे गंभीर आजार होतात. तसेच मांसाहार करणाऱ्या लोकांनी आहारात मासे व बलकशिवाय अंडी खावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मूळव्याधाची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: शौचाच्या वेळी वेदना किंवा आग होणे, गुदद्वाराच्या भागात खाज किंवा जळजळ

  • Que: मूळव्याध होण्याची कारणे काय आहेत?

    Ans: जुनाट बद्धकोष्ठतेमुळे मलविसर्जनाला जोर लावावा लागतो.

  • Que: मूळव्याधावर घरगुती उपाय काय आहेत?

    Ans: आहारात हिरव्या पालेभाज्याफळे (पपईकेळी)आणि डाळींचा समावेश करा, दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या.

Web Title: Hemorrhoids will be destroyed from the roots eat fiber rich foods regularly to cleanse the colon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • constipation
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Child Constipation: बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक
1

Child Constipation: बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
2

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
3

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण
4

अंडाशयात एकाच गाठीमध्ये दोन दुर्मीळ कर्करोग! मुंबईतील डॉक्टरांनी नोंदवले वैद्यकीय साहित्यातील पहिले प्रकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.