
नसांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने खा लसूण, कोलेस्टेरॉल आणि हार्ट अटॅकचा धोका कायमचा होईल नष्ट
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय?
लसूण खाण्याची पद्धत?
लसूण खाण्याचे फायदे आणि तोटे?
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, कमी पाणी पिणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तरुण वयात हार्ट अटॅक येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. रक्तात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्षणे दिसून येत नाहीत. पण कालांतराने लक्षणे अधिक तीव्र होतात आणि कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.(फोटो सौजन्य – istock)
Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या अनावश्यक चरबीमुळे रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, चालताना दम लागणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. हार्ट अटॅक आल्यानंतर काहीवेळा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे, अन्यथा जीवावर बेतू शकते. आज आम्ही तुम्हाला वाढत्या कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकपासून सुटका मिळवण्यासाठी लसूण खाण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने लसूण खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
जेवण बनवताना पदार्थाची चव वाढवण्यासाठी लसुणचा वापर केला जातो. लसूण जेवणात टाकल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. त्यामुळे लसूण खावी. रोज सकाळी उठल्यानंतर एक पाकळी लसूण कच्ची चावून खाल्ल्यास रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले कोलेस्ट्रॉल नष्ट होण्यास मदत होईल. यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ होतात, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो आणि हृदयातील ब्लॉकेज विरघळून जातात. लसूणमध्ये ॲलिसिन आढळून येते, ज्यामुळे रक्तातील घाण स्वच्छ होते.
कच्च्या लसूणमध्ये अनेक जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आढळून येतात. तसेच यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट, दाहक-विरोधी घटक कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात. हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी लसूण खावा. रोजच्या आहारात नियमित लसूण खाल्ल्यास हार्ट ब्लॉकेजचा धोका कमी होऊन आरोग्य चांगले राहते. लसूण रक्तवाहिन्यांची कार्यक्षमता सुधारून सैल ठेवण्यास मदत करतो, ज्याच्या परिणामामुळे रक्तप्रवाह सुरळीत चालू राहण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित एक किंवा दोन कच्चा लसूण चावून खावा.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कच्चा लसूण खात असाल तर मर्यादित प्रमाणात सेवन करावे. अतिप्रमाणात लसूण खाल्ल्यास पोटात उष्णता वाढू शकते. त्यामुळे लसूण मधात किंवा तुपात भाजून खावा. अतिप्रमाणात लसूण खाल्ल्यास ऍसिड रिफ्लक्स, गॅस्ट्रायटिस, पोट फुगणे, मळमळ आणि अपचनाचा त्रास, छातीमध्ये जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मर्यादित प्रमाणात लसूण खावा.
Ans: नियमित आणि संतुलित प्रमाणात लसूण खाल्ल्याने LDL (खराब) कोलेस्टेरॉल कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते. मात्र तो औषधांचा पर्याय नाही.
Ans: धमन्यांमध्ये चरबीचे थर (प्लाक) तयार होण्याची प्रक्रिया केवळ लसूण खाल्ल्याने पूर्णपणे नाहीशी होत नाही. यासाठी संतुलित आहार, व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि गरज असल्यास वैद्यकीय उपचार आवश्यक असतात.
Ans: लसूण हा हृदयासाठी लाभदायक आहाराचा एक भाग असू शकतो. परंतु हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, धूम्रपान, वजन आणि नियमित व्यायाम यांच्याकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.