
उपाशी पोटी या फळाचे सेवन केल्यास आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ, कोलेस्ट्रॉलने ब्लाॅक झालेल्या नसा होतील स्वच्छ
पपई खाण्याचे फायदे?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय?
आतडे स्वच्छ करण्यासाठी काय खावे?
Papaya Benefits: सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? असे अनेक प्रश्न सगळ्यांच पडतात. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, शरीराकडे वांरवांर होणारे दुर्लक्ष इत्यादीमुळे आरोग्याला हानि पोहचते. आहारात कायमच ताज्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे पपई. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच पपई खायला खूप जास्त आवडते. यामध्ये असलेले पेपेन एंझाइम, फायबर आणि विटामिन सी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवण्यास मदत करते. त्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र रोजच्या आहारात पपई खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया पपई खाण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)
पपईमध्ये असलेल्या पेपेन’ नावाचे एंझाइममुळे बद्धकोष्ठतेसारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पपईच्या सेवनाने मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल सुधारते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात पपईचा समावेश करावा. दररोज पपई खाणे अत्यंत प्रभावी मानले जाते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पपईचे सेवन करावे.
पपईमध्ये ‘पेपेन’ एंझाइम असते, जे प्रथिनांच्या पचनात महत्त्वाची भूमिका बजावते. पपई खाल्ल्यामुळे अन्न पचायला सोपे जाते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. अपचन, बद्धकोष्ठता व पोट फुगणे यांसारख्या पचनाच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात पपईचा समावेश करावा. पपईमध्ये असलेले ‘पेपेन’ एंझाइम जटिल प्रथिनांचे सहजपणे विघटन करते, ज्याच्या परिणामांमुळे खाल्ले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होते.
पपईमधील फायबर अन्नपदार्थ सहज पचन करण्यास मदत करतात. फायबरयुक्त फळ पचनसंस्था आणि आतडे सक्षम ठेवून वाढलेले वजन झपाट्याने कमी करतात. त्यामुळे वजन कमी करताना आहारात फायबरयुक्त फळ, भाज्यांचा समावेश करणे फार आवश्यक आहे. सकाळी पपई खाल्ल्यास त्यातील विद्राव्य आणि अविद्राव्यफायबरमुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि लवकर खाण्याची अजिबात ईच्छा हाेत नाही.
पपईमध्ये विटामिन सी, विटामिन ए, पोटॅशियम व फोलेट यांसारखी पोषक तत्त्वे आढळून येतात.विटामिन सी आणि बीटा-कॅरोटीन संयुगे शरीरासाठी अतिशय महत्वाची ठरतात. कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन रोखण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहीलेली घाण स्वच्छ करण्यासाठी पपईचे आहारात सेवन करावे.
Ans: फळांमधील फायबर पचनक्रिया आणि नियमित मलविसर्जनास मदत करू शकते. मात्र उपाशीपोटी फळ खाल्ल्याने आतड्यांमधील “घाण” पूर्णपणे साफ होते, असा दावा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही.
Ans: सफरचंद, नाशपती, संत्री, पेरू यांसारखी फायबरयुक्त फळे संतुलित आहाराचा भाग म्हणून कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरू शकतात.
Ans: नाही. फळे दिवसाच्या कोणत्याही वेळी खाता येतात. कोणत्या वेळी फळ खावे यापेक्षा एकूण आहारात पुरेशी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे अधिक महत्त्वाचे आहे.