तूप खाण्याचे फायदे
भारतासह राज्यातील सर्वच भागांमध्ये तुपाचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. तूप खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. तुपामध्ये असलेले गुणधर्म आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच चपाती, पराठे, पुरी, डाळ, भाज्या, गोड पदार्थ इत्यादी अनेक गोष्टी बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. जेवणातील पदार्थांमध्ये तूप टाकल्यानंतर जेवणाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. तूप टाकून बनवलेले अन्नपदार्थ पचनास हलके आणि पौष्टीक असतात. त्यामुळे रोजच्या आहारात 1 ते 2 चमचे तुपाचे सेवन आवश्यक करा.
मागील अनेक शकतांपासून तुपाचा वापर आयुर्वेदामध्ये केला जात आहे. तुपात असलेल्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्मांमुळे अनेक लोक नियमित तुपाचे सेवन करतात. खोकला, सर्दी, त्वचारोग इत्यादी आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये, म्हणून तुपाचे सेवन केले जाते. सतत बाहेरचे पदार्थ खाऊन बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात तुपाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला तूप खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? तुपाचे सेवन कोणत्या पद्धतीने करावे? याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: ‘या’ 5 फूड्समध्ये आहेत कॅल्शियमचा खजिना, रोज खाल्ल्याने होतील हाडं दणकट
तुपामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. तसेच तुपामध्ये तुपामध्ये फॅटी ॲसिडसिड आढळून येते.नियमित एक किंवा दोन चमचे तूप खाल्यास त्वचेवरील हरवलेली चमक पुन्हा परत मिळवण्यास मदत होईल. त्यामुळे नियमित तुपाचे सेवन करावे.तुपामध्ये जास्त कॅलरीज आणि फॅट असतात. त्यामुळे अनेकदा डॉक्टर योग्य आणि कमी प्रमाणात तूप खाण्याचा सल्ला देतात.तसेच तुपामध्ये ए, डी, ई आणि के सारख्या चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे आढळून येतात.
हे देखील वाचा: पोटातील गॅसमुळे सतत डोकं दुखत का? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा