Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. शिवाय ज्या पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असेल त्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 10, 2024 | 11:00 AM
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन

Follow Us
Follow Us:

जीवन जगण्यासाठी पाणी पिणे फार आवश्यक आहे. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याचे सेवन केले जाते. पाणी प्यायल्यामुळे पोटातील विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. उन्हाळ्यासह सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट असणे फार गरजेचे आहे. त्यामुळे नियमित 7 ते 8  ग्लास पाणी प्यावे पाणी प्यायल्यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. तसेच शरीरातील प्रत्येक पेशींला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पाण्याचे सेवन अधिक करावे. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथी दाण्याचं पाणी..

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शरीर डिहायड्रेड होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन:

काकडी:

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून रोजच्या आहारात काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्यामुळे शरीरात पाण्याची पातळी स्थिर राहते. शिवाय काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. काकडीमध्ये पाण्यासोबतच फायबर मुबलक प्रमाणात आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारून आरोग्याला अनेक फायदे होतात. रोजच्या आहारात काकडीचे सेवन केल्यास शरीरात थंडावा कायम टिकून राहील.

टरबूज:

टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीर आणि त्वचा ताजी टवटवीत राहण्यास मदत होते. टरबूजमध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या फळामध्ये बीटा-कॅरोटीन आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात टरबूजचे सेवन करावे. उन्हाळ्यात बाहेर फिरवून आल्यानंतर किंवा व्यायाम करून आल्यानंतर टरबूजचे सेवन करावे. ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.

नारळ पाणी:

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी नियमित एक नारळ पाणी प्यावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे शरीरातील कमी झालेली पाण्याची पातळी भरून काढण्यासाठी आहारात नारळ पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाण्यामध्ये कमी कॅलरीज असतात.

हे देखील वाचा: रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी ठरेल घातक! जाणून घ्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणाम

टोमॅटो:

शरीरात पाण्याची कमतरता जाणवू लागल्यानंतर टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्यामुळे आरोग्य सुधारते. यामध्ये 93 टक्के पाणी असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. रोजच्या आहारात टोमॅटोचे सेवन केल्यास त्वचा आणि शरीराला फायदे होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume these foods in your diet to compensate for the lack of water in the body in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2024 | 11:00 AM

Topics:  

  • healthy food
  • winter health tips

संबंधित बातम्या

फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या
1

फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी
2

प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी केवळ अंडीच नाहीतर ‘या’ शाहाकारी पदार्थांचा करा आहारात समावेश, राहाल कायमच हेल्दी

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी
3

वजन कमी करणारी दशसूत्रे! आहारात करा या १० भारतीय पदार्थांचा समावेश, सटासट वितळेल पोटावरची चरबी

Food Poisoning:  घरच्या अन्नामुळेही होऊ शकते फूड पॉइझनिंग?  स्वयंपाकघरातील ‘या’ छोट्या चुका पडू शकतात महागात
4

Food Poisoning: घरच्या अन्नामुळेही होऊ शकते फूड पॉइझनिंग? स्वयंपाकघरातील ‘या’ छोट्या चुका पडू शकतात महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.