Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rava Chilla: नाश्त्यात काहीतरी हेल्दी अन् टेस्टी हवंय? फक्त १५ मिनिटांत बनवा कुरकुरीत रव्याचा चिला; रेसिपी नोट करा

Rava Chilla Easy Healthy Recipe: सकाळच्या नाश्त्याला रोज उपमा खाऊन कंटाळात, तर एकदा ही रवा चिल्याची सोपी आणि हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 12, 2026 | 10:05 PM
photo- Ai generated

photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यासाठी हेल्दी पर्याय शोधताय?
  • बनवा झटपट रव्याचा चीला
  • रव्याचा चीला रेसिपी नोट करा
Rava Chilla Recipe: सकाळच्या धावपळीत नाश्त्यासाठी रोज काय बनवायचे, असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. दररोजच्या नाश्त्याला पोहे, उपमा किंवा पराठे खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे आणि टेस्टी डिश ट्राय करा.कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळेत तयार होणारा रव्याचा चिला हा नाश्त्याचा बेस्ट पर्याय आहे. विशेष बाब म्हणजे, हा चिला बनवण्यासाठी फारसे साहित्य लागत नाही. रव्यामध्ये दही आणि आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या घातल्यास त्याची चव अधिक छान लागते. यामध्ये भाज्यांचा समावेश केल्यामुळे हा नाश्ता अजून हेल्दी बनतो. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया रव्याचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.

Diabetes: वारंवार तहान, थकवा अन् भूक लागतेय! शरीरातील ‘या’ बदलांकडे दुर्लक्ष नको; असू शकतो मधुमेहाचा धोका

रव्याचा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप बारीक रवा
  • अर्धा कप दही
  • अर्धा कप पाणी
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • अर्धी चिरलेली ढोबळी मिरची
  • १ किसलेले गाजर
  • कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • अर्धा चमचा जिरे
  • आवश्यकतेनुसार तेल

रव्याचा चिला बनवण्याची कृती

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात रवा आणि दही एकत्र मिक्स करून घ्या. यामध्ये थोडे पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ तयार करा. यानंतर, हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा व्यवस्थित फुलेल. आता या मिश्रणात चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, किसलेले गाजर, कोथिंबीर, जिरे आणि मीठ घाला आणि सर्व मिक्स करुन घ्या. यानंतर, आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून डोशाच्या पिठासारखा बॅटर तयार करा.

मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन घेतल्यानंतर गॅसवर नॉनस्टिक तवा गरम चांगला गरम करा. यानंतर, त्यावर थोडे तेल लावा. नंतर थोडे पीठ ओतून डोशाच्या आकारात गोलाकार पसरवा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चिला भाजून घ्या.गरमागरम रव्याचा चिला हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करु शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी ही रेसिपी उत्तम आहे.

टिप्स

  • चिला बनवण्यापूर्वी रवा १५ ते २० मिनिटे भिजवून ठेवा. त्यामुळे चिला चविष्ट होतो.
  • पीठ खूप घट्ट किंवा पातळ करू नका. डोशाच्या पिठासारखी मिश्रण तयार करा.
  • चिला मध्यम ते मंद आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
Stress Affects: रोजची चिंता, चिडचिड अन् निद्रानाश! सततच्या तणावामुळे फक्त मेंदूच नाही, तर संपूर्ण शरीरावर होतो परिणाम; जाणून घ्या

Web Title: Easy rava chilla recipe healthy quick breakfast pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • healthy food

संबंधित बातम्या

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
1

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल
2

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
3

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ
4

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.