रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
भारतासह इतर सर्वच देशांमध्ये चहा हे लोकप्रिय पेय आहे. काहींना काळा चहा तर काहींना दुधाचा चहा प्यायल्या खूप आवडतो. अनेकांची सकाळ चहाने होते. चला प्यायल्याशिवाय सकाळ झाल्यासारखे वाटत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चहा पिण्याची अनेकांना सवय असते. मात्र हीच सवय पुढे जाऊन आरोग्यासाठी घातक ठरते. अनेक लोक चहा झोप उडवण्यासाठी पितात तर काही लोक चहा औषधी गुणधर्म म्हणून सेवन करतात. पण अतिप्रमाणात चहाचे सेवन केल्यास आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दुधाचा चहा पिण्याऐवजी काळ्या चहाचे सेवन करावे. काळा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त तयार होते. शिवाय अपचनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन 2024, जाणून घ्या कशी झाली या खास दिवसाची सुरुवात
अनेकांना सतत चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण सतत चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे शरीराला कॅफिनची सवय लागते. ही सवय लागल्यानंतर सहजासहजी सुटत नाही. कॅफिनचे व्यसन लागल्यानंतर चहा पिण्याची सतत इच्छा निर्माण होत राहते. त्यामुळे नियमित कमीत कमी चहा कॉफीचे सेवन करावे.
चुकीच्या पद्धतीने आहार घेतल्यामुळे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. त्यामुळे नेहमी शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. सतत चहा प्यायल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात चहाचे सेवन करावे. ब्लडप्रेशर,मधुमेह इत्यादी गंभीर आजार वाढण्याची शक्यता असते.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पचनक्रिया बिघडू लागते. अपचन, जळजळ, गॅस, पोट स्वच्छ न होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. इत्यादी गोष्टींचा त्रास होऊन नये म्हणून कमी चहाचे सेवन करावे.
सतत चहाचे सेवन केल्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू लागते. त्यामुळे दिवसभरात १ किंवा २ कप चहाचे आणि कॉफीचे सेवन करावे. अतिप्रमाणात चहाचे सेवन केल्यामुळे झोपेची गुणवत्ता बिघडून आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. चांगली झोप पूर्ण न झाल्यामुळे आजार वाढू लागते.
हे देखील वाचा: दिवसभरात किती मिनिटं चालावे? नियमित चालल्यामुळे शरीराला होतात चमत्कारीत फायदे, जाणून घ्या सविस्तर
चहा आणि कॉफीमध्ये असलेले कॅफिन आरोग्यासाठी घातक आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहाचे किंवा कॉफीचे सेवन केल्यास दातांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दातांवर पिवळ्या रंगाचा थर साचू लागतो. ज्यामुळे हिरड्या खराब होतात.