गट हेल्थ सुधारण्यासाठी आहारात करा या पदार्थांचे सेवन
दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींनमध्ये बदल झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक कारणांमुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचे सुद्धा नुकसान होऊ लागते. त्यामुळे थंडीसह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आहारामध्ये बदल झाल्यानंतर किंवा जंक फूडचे अतिप्रमाणात सेवन केल्यानंतर त्वचेवर पिंपल्स, ऍक्ने, पुरळ, फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचेवर ऍक्ने आल्यानंतर ते लवकर चेहऱ्यावरून जात नाही. अनेकदा याच ऍक्नेमुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्वचेच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेल्यामुळे आणि चुकीच्या गट हेल्थमुळे चेहऱ्यावर ऍक्ने आणि पिंपल्स येऊ लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
शरीर डिटॉक्स करण्यासाठी आहारात करा ‘या’ आंबट गोड फळाचे सेवन,आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
अनेक महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र या प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेच्या आरोग्याचे नुकसान होऊ लागते. याशिवाय गट हेल्थ खराब झाल्यानंतर त्वचा आणखीनच जास्त खराब होऊन जाते. त्वचेवर ऍक्ने आणि पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी महिला वेगवेगळ्या पदार्थांचा आणि प्रॉडक्टचा वापर करतात. चेहऱ्यावर आलेले ऍक्ने मेकअप करताना किंवा इतर वेळी कोणत्याही कार्यक्रमात गेल्यानंतर लुक पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बिघडलेले गट हेल्थ सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
दैनंदिन आहारात अतिप्रमाणात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे गट हेल्थमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. सतत खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप, मानसिक तणाव इत्यादी गोष्टींमुळे पचनाच्या समस्या उद्भवू लागतात. ज्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. शरीरामध्ये विषारी पदार्थ साचून राहिल्यामुळे आतड्या आणि पोट स्वच्छ होत नाही. हाय फॅट किंवा प्रोसेस्ड फूडमध्ये अजिबात फायबर आढळून येत नाही. त्यामुळे गट हेल्थच्या हालचालींमध्ये बदल होऊ लागतात.
गट हेल्थमध्ये बिघाड झाल्यानंतर छोटे छोटे गॅप्स तयार होऊन शरीरातील विषारी पदार्थ त्यामध्ये साचून राहण्यास सुरुवात होते. यामुळे त्वचेवर मोठ्या प्रमाणात पिंपल्स आणि ऍक्ने मार्क्स येतात. तसेच त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल त्वचेचे नुकसान करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर भरपूर पुरळ आणि ऍक्ने येऊ लागतात.
सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर लावा ‘हे’ पदार्थ, दिवसभर त्वचा राहील फ्रेश आणि ताज़ीटवटवीत
बिघडलेली गट हेल्थ सुधारण्यासाठी दैनंदिन आहारात प्रोबायोटिक्स युक्त पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. या पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
दह्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोबायोटिक्स आढळून येतात. याशिवाय दह्याचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
त्वचेवरील ऍक्ने मार्क्स घालवण्यासाठी दैनंदिन आहारात लसूणचे सेवन करावे. लसूण खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याशिवाय आरोग्याला अनेक फायदे होतात. लसूणमध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात.