सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर लावा 'हे' पदार्थ
सर्वच महिला त्वचेच्या आरोग्याची काळजी घेतात. चमकदार आणि गोरीपान त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये किंवा वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक महिला सुंदर त्वचेसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या आणि केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. पण पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअर करताना ‘या’ चुका करणे टाळा, अन्यथा चेहऱ्यावरील पिगमेंटेशन, पिंपल्समुळे त्वचा होईल खराब
त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करतात. कधी फेशिअल करून घेणे, तर कधी महागड्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. मात्र या ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ त्वचा अधिक सुंदर दिसते. पण कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सुंदर आणि फ्रेश त्वचेसाठी सकाळी उठल्यानंतर कोणते पदार्थ त्वचेला लावल्यास त्वचा अधिक सुंदर होईल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफड त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. नियमित कोरफडचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचेवर टॅन कमी होऊन चेहरा खुलून दिसेल. यासाठी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्वचेवर कोरफड जेल लावून त्वचा काहीवेळ हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे त्वचेवरील रक्तभिसरण सुधारेल आणि चेहरा स्वच्छ होईल. चेहऱ्यावरील डाग, ड्रायनेस, टॅनिंग घालवण्यासाठी कोरफड गराचा वापर करावा.
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर टोनर म्हणून गुलाब पाण्याचा वापर करा. गुलाब पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. कापसाच्या मदतीने तुम्ही त्वचेवर गुलाब पाणी लावू शकता. यामुळे त्वचेवरील घाण, धूळ, माती स्वच्छ होण्यास मदत होईल आणि त्वचा अधिक उठावदार दिसेल.
त्वचेसाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर! पिगमेंटेशन, पिंपल्सची समस्या होईल कायमची दूर
खराब झालेली त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मधाचा वापर करावा. मध वापरल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते. याशिवाय मधाचा वापर केल्यामुळे त्वचा मॉइश्चराईज होण्यास मदत होईल. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर मध लावून ठेवा. त्यानंतर काहीवेळाने त्वचा पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील.