सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पदार्थांचे सेवन
जगभरात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. याशिवाय योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर कायम गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते. अन्यथा मधुमेह आणखीनच वाढण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल, पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. घरगुती उपाय आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामुळे काही दिवसांमध्येच शरीरात अनेक बदल दिसून येतील.(फोटो सौजन्य – iStock)
जेवणातील पदार्थ बनवताना भारतीय मसाल्यांचा वापर केला जातो. मसाल्यांच्या वापरामुळे पदार्थाची चव वाढते. यासोबतच शरीराला अनेक फायदे सुद्धा होतात. त्यातील सगळ्यात गुणकारी पदार्थ म्हणजे दालचिनी आणि काळीमिरी. चवीला अतिशय तिखट असलेले पदार्थ आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दालचिनी आणि काळीमिरीच्या पाण्याचे एकत्र सेवन करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीराला आलेली सूज कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी प्यावे. यामुळे चयापचय क्रिया वेगवान होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. हृदयाच्या आरोग्यासाठी दालचिनीचे पाणी अतिशय प्रभावी आहे.
मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. या पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे वाढलेला रक्तदाब नियंत्रणात राहतो. यासोबतच मधुमेहावर मेथी दाण्यांचे पाणी अतिशय प्रभावी आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. या दाण्यांमध्ये असलेले गुणधर्म मधुमेह नियंत्रणात ठेवतात.
रात्री अचानक लागलेली भूक भागवण्यासाठी बिस्कीट खाण्याऐवजी करा ‘या’ पदार्थाचे सेवन, राहाल कायम निरोगी
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबू हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. लिंबू हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रक्ताभिसरण सुधारते, त्वचा उजळते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी हळद आणि लिंबाच्या पाण्याचे सेवन करावे.