अचानक वाढलेल्या उच्च रक्तदाबामुळे हार्टवर येईल ताण? WHO ने सांगितलेले 'हे' उपाय करून मिळवा आराम
धावपळीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाचा वाढलेला ताण, शरीरात होणारे छोटे मोठे बदल, आहारातील बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर दिसतो. यामुळे कायमच थकवा, अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. बऱ्याचदा शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हेच आजार गंभीर स्वरूप घेतात. त्यामुळे आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. याशिवाय वाढलेल्या रक्तदाबामुळे हार्टवर ताण येण्याची शक्यता असते. रक्तदाब वाढल्यानंतर हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणं, ब्रेन स्ट्रोक येणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – iStock)
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर घाबरून न जाता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सादर केलेल्या अहवालानुसार,30 ते 79 वयोगटातील जवळपास 1.28 अब्ज लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेणे, सतत चिंतेत राहणे, चुकीच्या सवयी फॉलो करणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी काही सोपे उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो.
दैनंदिन आहारात आपल्यातील अनेकांना अतितिखट खाण्याची सवय असते, तशीच सवय अतिमीठ खाण्याची सुद्धा असते. जास्त मिठाचे पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, पॅकबंद स्नॅक्स, चिप्स, सूप किंवा सॉस इत्यादी पदार्थांमध्ये खूप जास्त मीठ असते. त्यामुळे नेहमी नेहमी या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. घरातील पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित कोणतीही गंभीर समस्या उद्भवत नाही. लिंबाचा रस, हळद, हिंग इत्यादी नैसर्गिक पदार्थांचे सेवन करावे.
वाढलेले वजन उच्च रक्तदाब वाढण्याचे प्रमुख कारण आहे. शरीरावर वाढलेल्या अनावश्यक चरबीमुळे आरोग्याला हानी पोहचते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा लठ्ठपणा वाढू लागतो. त्यामुळे शरीराचे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी आहारात कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्यामुळे शरीरावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी होते.
उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी नियमित रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. रक्तदाब तपासल्यामुळे मधुमेह, हृदयविकार किंवा आणखीन कोणत्याही आजारांपासून शरीराला लांब ठेवता येते. त्यामुळे घरात डिजिटल बीपी मॉनिटर असणे आवश्यक आहे. याशिवाय सतत दारू किंवा धूम्रपान करणे टाळावे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शरीराला हानी पोहचेल.