Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन करावे. भाज्यांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक सहज बाहेर पडून जातील. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 26, 2025 | 05:30 AM
संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' भाज्यांचे करा सेवन

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी 'या' भाज्यांचे करा सेवन

Follow Us
Follow Us:

युरिक ॲसिड म्हणजे काय?
युरिक ॲसिड वाढल्यानंतर शरीरात दिसणारी लक्षणे?
सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी उपाय?

थंडीच्या दिवसांमध्ये हाडांमध्ये वेदना वाढू लागतात. पण काहीवेळा अचानक हातपाय दुखणे, कंबर दुखणे, संधिवातामुळे पाय वाकडे होणे, चालताना किंवा उभे राहताना गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. ही समस्या शरीरात वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे उद्भवते. रक्तात किंवा हाडांमध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसू लागतात. पण कालांतराने या लक्षणांकडे वाढ झाल्यानंतर शरीराला खूप जास्त हानी पोहचते. युरिक ॲसिडचे क्रिस्टल सांध्यांमध्ये साचून राहिल्यानंतर गाऊट, सूज, सांधेदुखी आणि किडनीच्या आजारांची शरीराला लागण होते. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हाडांमध्ये साचून राहिलेले युरिक ॲसिड आणि विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. याशिवाय या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.(फोटो सौजन्य – istock)

Amruta Fadnavis वयाच्या 46 व्या वर्षीही अभिनेत्रींना फिटनेसच्या बाबतीत देत आहेत मात! ‘या’ प्रभावी पेयाचे सेवन ठेवेल फिट

काकडी:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काकडी खायला खूप जास्त आवडते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे रक्तात साचून राहिलेली घाण सहज बाहेर पडून जाते. काकडीच्या थंडाव्यामुळे किडनीचे कार्य सुधारते. याशिवाय सांध्यांमध्ये साचून राहिलेले युरिक ऍसिडी बाहेर पडून जाते. काकडीचे सेवन सॅलड किंवा डिटॉक्स ड्रिंक बनवून सुद्धा करू शकता. काकडीचा रस प्यायल्यामुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.

गाजर:

थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि व्हिटॅमिन ए इत्यादी अनेक घटक आढळून येतात. या घटकांमुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. गाजरपासून तुम्ही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. गाजरमध्ये असलेल्या नैसर्गिक दाहशामक गुणधर्मांमुळे गाऊट आणि सांध्यांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतात आणि आराम मिळतो.

सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नसेल तर उपाशी पोटी करा ‘या’ हर्बल टी चे सेवन, आतड्यांमधील घाण पडून जाईल बाहेर

टोमॅटो:

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट गोड चवीचे टोमॅटो चवीला अतिशय सुंदर लागते. टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि लायकोपीन आढळून येते, ज्यामुळे शरीराची पीएच पातळी संतुलित राहते. युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी उपाशी पोटी टोमॅटोच्या रसाचे सेवन करावे. यामुळे सांध्यांमध्ये जमा झालेले युरिक ॲसिड लघवीवाटे बाहेर पडून जाईल. टोमॅटोपासून तुम्ही सूप सुद्धा बनवू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these vegetables to flush out the uric acid accumulated in the bones vegetables for reduce uric acid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • healthy food
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ
1

Bone Health: वाढत्या वयात हाडं मजबूत ठेवायची? फक्त दूधच नाही; दररोज खा ‘हे’ कॅल्शियमयुक्त पदार्थ

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल
2

‘या’ पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास मेंदूच्या नसांवर होईल गंभीर परिणाम, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.