Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Foods You Should Not Avoid: जिभेचे चोचले की आरोग्याशी खेळ? बटाट्यापासून पॉपकॉर्नपर्यंत, ‘या’ ८ पदार्थांचं गुपित काय?

Foods You Should Not Avoid: वजन कमी करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आवडीचे पदार्थ पूर्णपणे सोडण्याची गरज नसते. बटाटा, अंडी, साधा पॉपकॉर्न, शुद्ध पीनट बटर, ब्लॅक कॉफी, डार्क चॉकलेट, दही आणि अॅव्होकॅडो यांसारख्या पदार्थांचा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने आहारात समावेश करता येतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 17, 2026 | 02:53 PM
Foods You Should Not Avoid: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Foods You Should Not Avoid: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • तळलेले पदार्थ टाळून उकडलेला बटाटा आणि कमी तेलाचा साधा पॉपकॉर्न निवडा
  • अंडी, शुद्ध पीनट बटर आणि अॅव्होकॅडो यांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश
  • साधे दही, कमी साखरेचे डार्क चॉकलेट आणि साखर न घातलेली कॉफी निवडण्याचा प्रयत्न
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वाटते की तब्येत चांगली ठेवायची असेल, वजन कमी करायचे असेल तर सगळे आवडीचे पदार्थ बंद करावे लागतात. सोशल मीडियावर कोणी काहीतरी सांगते आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. पण खरे सांगायचे तर आपण ज्या पदार्थांना वाईट समजून सोडून देतो, तेच पदार्थ शरीरासाठी चांगले असतात. या पदार्थ खाण्याची पद्धत चुकल्याने त्याचे शरीरावर वाईट परिणाम होतात. तेलात तळणे, जास्त साखर टाकणे हे बंद केले तर तेच पदार्थ औषधासारखे काम करतात.चला मग असे काही पदार्थ बघूया ज्यांना आपण उगाचच बदनाम केले आहे. Foods You Should Not Avoid:

1. बटाटा – सगळ्यात जास्त गैरसमज असलेला

बटाटा खाल्ला की जाड होतो, असे सगळे म्हणतात. कारण आपण बटाट्याचे वेफर्स, समोसा, फ्रेंच फ्राईज खातो. पण खरा बटाटा खूप चांगला असतो. त्याच्यात फॅट अजिबात नसते. उकडलेल्या बटाट्यात व्हिटॅमिन C, पोटॅशियम आणि फायबर भरपूर असते. पोट भरते आणि ताकद पण येते. तळण्याऐवजी जर उकडून किंवा भाजी करून खाल्ला तर बटाट्यासारखा चांगला पदार्थ नाही.

2. अंडी – पिवळा भाग खाऊ नका म्हणतात

अनेक वर्षे लोकांना सांगितले गेले की अंड्यातला पिवळा भाग खाऊ नका, त्याने कोलेस्टेरॉल वाढते. पण आता डॉक्टरच सांगतात की एका निरोगी माणसाने रोज एक पूर्ण अंडे खाल्ले तरी काही होत नाही. अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन D, B12 असते. डोळ्यांसाठी पण ते चांगले असते. ज्याला जिम करायची आहे त्याने तर अंडे खायलाच पाहिजे.

3. पॉपकॉर्न – थिएटर वाला नको, घरचा चांगला

थिएटरमध्ये लोणी आणि मीठ टाकून दिलेला पॉपकॉर्न नक्कीच जंक फूड आहे. पण घरी मक्यापासून बनवलेला साधा पॉपकॉर्न हा पूर्ण धान्य आहे. त्याच्यात फायबर असते. तेल न टाकता फक्त गरम हवेवर बनवलेला पॉपकॉर्न वजन कमी करणाऱ्यांसाठी बेस्ट स्नॅक आहे. पोट भरते पण वजन वाढत नाही.

4. पीनट बटर – जाड होऊ म्हणतात

पीनट बटरमध्ये फॅट असते म्हणून लोक घाबरतात. पण त्यातले फॅट हे चांगले फॅट आहे, हृदयासाठी चांगले असते. त्यात प्रोटीन आणि व्हिटॅमिन E पण असते. फक्त बाजारातले साखर घातलेले पीनट बटर घेऊ नका. शेंगदाण्याचे शुद्ध बटर घ्या, ते तब्येतीसाठी एकदम मस्त आहे.

5. कॉफी – ब्लॅक कॉफी प्या

कॉफीने झोप उडते, हृदयाची धडधड वाढते असे म्हणतात. पण कॉफीमध्ये साखर किंवा क्रीम न टाकता साधी ब्लॅक कॉफी प्या. ती आरोग्यासाठी चांगली असते.

6. डार्क चॉकलेट – खरच गुणकारी

चॉकलेटने दात किडतात, लठ्ठपणा येतो असे आपण लहानपणापासून ऐकतो. पण 70 टक्क्यापेक्षा जास्त कोको असलेले डार्क चॉकलेट औषध आहे. त्याने रक्ताभिसरण चांगले होते, हृदय मजबूत होते. त्यात लोह पण असते. रोज एक छोटा तुकडा खाल्ला तर काहीच नुकसान नाही.

Sabudana Papad Recipe : बाजारातून विकत कशाला घ्यायच? घरीच बनवा कुरकुरीत, वर्षभर टिकणारा ‘साबुदाण्याचा पापड’

7. दही – फॅट आहे म्हणून नको म्हणू नका

काही लोक दही टाळतात. पण दह्यात कॅल्शियम, प्रोटीन आणि पोटासाठी चांगले बॅक्टेरिया असतात. रोजच्या जेवणात थोडे दही हवेच. फक्त बाजारातले स्ट्रॉबेरी, मँगो फ्लेवरचे गोड दही घेऊ नका. साध्या दह्यात फळे टाकून खा.

Lifestyle Tips : ओठ वारंवार फाटतात? मऊ ओठांसाठी त्वचातज्ज्ञांनी सांगितला ‘हा’ खास घरगुती उपाय!

8. अॅव्होकॅडो – महाग आहे पण बेस्ट आहे

यात फॅट जास्त आहे म्हणून लोक नाक मुरडतात. पण हे फॅट वाईट कोलेस्टेरॉल कमी करते. हृदयासाठी खूप चांगले आहे. यात फायबर आणि पोटॅशियम पण भरपूर आहे.तर मित्रांनो, लक्षात ठेवा कोणताही नैसर्गिक पदार्थ वाईट नसतो. आपण तो कसा बनवतो आणि किती खातो यावर सगळे अवलंबून असते. प्रोसेस केलेले, पॅकेटमधले, जास्त साखर आणि तेल असलेले पदार्थ टाळा. निसर्गाने दिलेले पदार्थ त्याच्या खऱ्या रूपात खा, तरच तब्येत चांगली राहील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वजन कमी करताना बटाटा खाऊ शकतो का?

    Ans: होय. उकडलेला किंवा कमी तेलात बनवलेला बटाटा योग्य प्रमाणात खाऊ शकता.

  • Que: रोज एक अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का?

    Ans: अनेक निरोगी व्यक्तींसाठी रोज एक अंडे संतुलित आहाराचा भाग

  • Que: वजन कमी करण्यासाठी कोणता पॉपकॉर्न खावा?

    Ans: कमी तेल, मीठ आणि लोणी वापरून घरी बनवलेला साधा पॉपकॉर्न हा चांगला पर्याय

Web Title: 8 healthy foods you should not avoid rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • healthy food
  • lifestlye tips
  • Nutrition

संबंधित बातम्या

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली
1

शस्त्रक्रियेच्या जगात नवं पाऊल! वॉकहार्ट मुंबई सेंट्रलमध्ये दाखल झाली Da Vinci X रोबोटिक प्रणाली

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा
2

Early Throat Cancer: ६८ वर्षीय रुग्णाला दुर्मिळ कर्करोगाचे निदान; आधुनिक शस्त्रक्रियेतून मिळाला दिलासा

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..
3

Jaw Cancer Surgery: “कर्करोगामुळे जबडा काढला… मग तो पुन्हा कसा तयार करतात? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात..

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.