कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' भाज्यांचे करा सेवन
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल दुसरे खराब कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल अत्यंत महत्वाचे आहे, ज्यामुळे शरीरात निरोगी पेशी तयार होतात. पण शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयविकाराचा धोका, पक्षाघात किंवा इतर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होऊन जातो. ज्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर रक्तप्रवाह मंद होऊन जातो. शिवाय यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी आहारात कोणत्या भाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या भाज्यांच्या सेवनामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. जंक फूड, तळलेले तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक हिरव्या पालेभाज्या उपलब्ध असतात. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पालकचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. पालक खाल्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि शरीराला अनेक फायदे होतात.
दुधाची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. पण या भाजीमध्ये अनेक पौष्टिक आणि आरोग्यासाठी प्रभावी घटक आढळून येतात. दुधाच्या भाजीमध्ये विटामिन सी, कॅल्शियम किंवा लोह इत्यादी अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
लोहयुक्त बीटचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून आरोग्याला अनेक फायदे होतात. काहींना कच्च बीट खायला आवडत नाही, अशावेळी तुम्ही बीटचा रस किंवा भाजी बनवून खाऊ शकता.बीटचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
ब्रोकोली खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. ब्रोकोलीमध्ये फायटोकेमिकल्स हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. शिवाय यामुळे ब्रोकोलीमध्ये असलेले फायबर खराब कोलेस्ट्रॉल खेचून घेऊन आरोग्य कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. दैनंदिन आहारात या भाज्यांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील.