रोजच्या आहारात करा 'या' विटामिन सी युक्त भाज्यांचे सेवन
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसबंधित समस्या उद्भवू लागते. या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर त्वचेवर पिंपल्स, मुरुम इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. यामुळे काहीकाळ त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. मात्र काहीकाळ नंतर त्वचा पूर्णपणे खराब होऊन जाते अशावेळी त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. पण या ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य-istock)
त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर केल्यास त्वचा नैसर्गिक रित्या चमकदार आणि सुंदर राहील. खराब झालेला त्वचेला वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील पिंपल्स आणि मुरुमनाचे डाग कमी होतात. दैनदिन आहारात शरीराला पचन होणाऱ्या गुणकारी पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतील आणि चेहरा सुंदर आणि उठावदार दिसेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
गाजर खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. गाजर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी आहे. गाजरचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील ग्लो कायम टिकून राहतो आणि त्वचा चमकदार सुंदर दिसते. यामध्ये असलेले अँटीआक्सीडेंट डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत. गाजरचा वापर करून रस, सॅलड इतरही पदार्थ बनवून खाऊ शकता. रोजच्या आहारात नियमित गाजरचे सेवन केल्यामुळे त्वचा दीर्घकाळ मुलायम आणि सुंदर राहते.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात उष्णता वाढू लागते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे शरीरात ओलावा कायम टिकून राहतो. काकडी खाल्यामुळे त्वचा कायम हायड्रेट राहते. अपुऱ्या झोपेमुळे किंवा जीवनशैलीतील बदलांमुळे डोळ्यांखाली आलेले डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी काकडीचा आहारात समावेश करावा. उन्हाच्या झळांमुळे त्वचेचे नुकसान होऊ नये म्हणून नियमित काकडी खावी. काकडीचा वापर तुम्ही सॅलड बनवण्यासाठी सुद्धा करू शकता.
सतत लिपस्टिक लावून ओठ काळे झाले आहेत? ओठ गुलाबी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय
त्वचेसाठी टोमॅटो अतिशय गुणकारी आहे. जेवणातील पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. आंबट चवीचा टोमॅटो जेवणातील पदार्थांसोबतच त्वचेवरील डाग घालवण्यासाठी सुद्धा केला जातो. टोमॅटोचा वापर फेसपॅक किंवा फेस स्क्रब बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. मुरूम किंवा पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी टोमॅटोचा वापर करावा. टोमॅटो खाल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि मुलायम राहते. यामुळे त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर होतात.