कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा 'हे' थंडगार मॉकटेल्स
पल्स टॉफी, हजमोला, कोल्ड्रिंक, लिंबू, पुदिन्याची पाने, काळे मीठ किंवा चाट मसाला आणि बर्फाचा वापर करून बनवलेले मसाला ड्रिंक सगळ्यांचं प्यायला खूप जास्त आवडते. हे पेय तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा बनवू शकता.
गुलाबाच्या सरबत, थंड दूध किंवा पाणी, तुळशीच्या बिया आणि लिंबाचा रस घालून बनवलेले गुलाब सरबत सगळेच खूप आवडीने पितात. गुलाब सिरपची बॉटल बाजारात सहज उपलब्ध होते.
आंबटगोड चवीच्या किवीपासून तुम्ही थंडगार ड्रिंक बनवू शकता. किवीमध्ये असलेले विटामिन सी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते आणि शरीरात थंडावा टिकून राहतो.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आवर्जून नारळ पाणी प्यावे. नारळ पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.
हॉटेल किंवा कॅफेमध्ये गेल्यानंतर आवडीने ब्लूबेरी ड्रिंक प्यायले जाते. ब्लूबेरी सिरप, पुदिन्याची पाने आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेले ड्रिंक चवीला अतिशय सुंदर लागते.