रोजच्या आहारात 'या' पद्धतीने करा चिया सीड्सचे सेवन
भारतासह जगभरात वाढलेले वजन आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. दैनंदिन आहारात होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, बिघडलेली पचन, शरीरात होणारे हार्मोन्सचे असंतुलन इत्यादी अनेक गोष्टींमुळे वजन वाढण्याची शक्यता असते. शरीरावर लटकणाऱ्या चरबीमुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊन जातो. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक आणि पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी अनेक महिला आहार तज्ज्ञांकडून महागडे डाएट घेतात. मात्र तरीसुद्धा फारसा बदल शरीरात दिसून येत नाही. त्यामुळे वजन कमी करताना चिया सीड्सचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, पोट होईल स्लिम
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चिया सीड्सचे सेवन केल्यास वाढलेले वजन आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स अतिशय प्रभावी मानल्या जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे कशा पद्धतीने सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने चिया सीड्सचे सेवन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कायमची वितळून जाईल आणि शरीर स्लिम, फिट दिसेल.
वाढलेले वजन आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी ग्रीन टी चे सेवन केल्यास वाढलेले वजन आणि लठ्ठपणा कमी होईल. ग्रीन टीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा आणि इतर समस्यांसाठी देखील प्रभावी आहे. ग्रीन टीमध्ये बर्फ घालून प्यायल्यास त्वचा ताज़ीटवटवीत आणि फ्रेश दिसेल.
चिया सीड्सचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये एक चमचा चिया सीड्स घेऊन त्यात पाणी टाकून भिजवून ठेवा. त्यानंतर १ तासांनी भिजवून घेतलेले चिया सीड्स काचेच्या ग्लासात घेऊन त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा. तयार केलेल्या पाण्याचे उपाशी पोटी नियमित सेवन केल्यास लठ्ठपणा कमी होईल आणि आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतील. हे पेय तुम्ही सकाळी उठल्यानंतर नियमित पिऊ शकता.
लिंबू पाण्यात चिया सीड्स टाकून प्यायल्यामुळे वजन कमी होईल. तसेच त्वचा आणि केसानसुद्धा अनेक फायदे होतील. शरीरात साचून राहिलेले हानिकारक घटक आरोग्यसाठी अतिशय घातक आहेत. हे घटक शरीरात दीर्घकाळ राहिल्यामुळे पोटात दुखणे, अपचन, गॅस इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पोटासंबंधित त्रास झाल्यास चिया सीड्सचे पाणी प्यावे. यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. कॅन्सर आणि साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो.