सकाळी उठल्यानंतर तोंड धुवण्याआधी करा 'या' आयुर्वेदिक पानाचे सेवन
बदलेली जीवनशैली, आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, जनक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर अनेक लोक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करतात. त्यामध्ये जिऱ्याचे पाणी प्यायले जाते तर काही लोक पेरूच्या पानांचे सेवन करतात. पेरूची पाने आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. या पानांमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. आयुर्वेदामध्ये पेरूच्या पानांना विशेष महत्व आहे. पेरूची पाने मौखिक आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पेरूची पाने खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पेरूच्या पानांचे सेवन केल्यामुळे पोट स्वच्छ होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक ठरतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर पेरूची पाने चावून खावीत त्यानंतर त्यावर पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये चिटकून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होईल आणि शरीर स्वच्छ होईल. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता इत्यादी आजारांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी पेरूची पाने खावीत.
राज्यासह संपूर्ण देशभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे तर कधी कडक ऊन असल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येत आहेत. अचानक पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली आहे. साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित पेरूच्या पानांचे सेवन करावे. पेरूची पाने खाल्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाची पातळी कमी होते, हिरड्यांना आलेली सूज कमी होण्यास मदत होते. या पानांमध्ये टॅनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
पेरूची पाने त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करतात. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी त्वचेवर वाढलेले डाग कमी करण्यासाठी करते. त्यामुळे नियमित पेरूच्या पानांचे सेवन करावे. त्वचेवर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी पेरूच्या पानांच्या सेवन करावे. यामुळे चेहरा अतिशय सुंदर आणि उजळदार होईल. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी पेरूची पाने नियमित खावीत.