स्ट्रेस अल्सर म्हणजे नेमकं काय? मानसिक तणाव वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' भयंकर लक्षणे
धावपळीचे जीवन जगणारी प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या मानसिक तणावात जगत आहे. शरीरात वाढलेला मानसिक तणाव आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी मानसिक तणावात जगणे आवश्यक आहे. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम मनावर आणि शरीरावर दिसून येतो. मानसिक तणावात जगत असलेली व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्येला तोंड देत असते. मानसिक तणाव शरीराच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम करतो. त्यामुळे नेहमीच आनंदी आणि हसत खेळत जीवन जगणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे स्ट्रेस अल्सर होण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्ट्रेस अल्सर म्हणजे काय? याची शरीरात दिसून येणारी लक्षणे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेली चरबी झपाट्याने कमी करेल ‘हे’ बारीक दाण्यांचे जादुई पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन
मानसिक तणावात असलेल्या व्यक्तीच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. स्ट्रेस अल्सर म्हणजे तणावामुळे पोटात जखमा होणे. या समस्येकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे हाच आजार आणखीन गंभीर होऊन मोठे स्वरूप घेण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात कोर्टिसोल व इतर स्ट्रेस हार्मोन्स वाढू लागतात. यामुळे पचनासाठी लागणारे आम्ल्पित्ता असंतुलित होऊन जाते, ज्यामुळे पोटात जळजळ, जखमा किंवा अल्सर तयार होण्याची जास्त शक्यता असते. शरीरात वाढलेला तणाव कमी करणे आवश्यक आहे. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित योगासने करणे, ध्यान करणे, मनाला आंनद वाटणाऱ्या गोष्टी करणे इत्यादींमुळे मानसिक तणाव कमी होतो.
पोटात वाढलेली जळजळ ही सामान्य समस्या असलेली तरीसुद्धा अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे आजार आणखीन गंभीर स्वरूप घेतात. पोटात जळजळ होणे, आंबटपणा वाढणे इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. बऱ्याचदा ही जळजळ छाती आणि गळ्यापर्यंत पोहचते. त्यामुळे पोटात जळजळ वाढल्यास डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.
स्ट्रेस अल्सर झाल्यानंतर शरीराची पचनक्रिया अतिशय कमकुवत होऊन जाते. ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास जास्तीचा वेळ लागतो. पचनक्रिया कमकुवत झाल्यानंतर भूक न लागणे, पोटात दुखणे, पोटात खवखव होणे, गॅस वाढणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. स्ट्रेस अल्सर आणखीनच गंभीर झाल्यानंतर उलट्या, मळमळ होण्याची जास्त शक्यता असते. तर काहीवेळा रक्ताच्या उलट्या होऊ लागतात.
पोटात अल्सर वाढल्यानंतर दुर्लक्ष केल्यास लघवीतून रक्त येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पोटात वाढलेल्या अल्सरकडे दुर्लक्ष करू नका. अल्सर झाल्यानंतर शरीराच्या आतून रक्तस्त्राव होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे लघवीचा रंग सुद्धा बदलू लागतो. काळसर किंवा रक्ताळलेला रंग लघवीमध्ये दिसून येतो. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.