
पोट आणि मांड्यांवर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी नियमित करा 'या' घरगुती आयुर्वेदिक पावडरचे सेवन
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहात. वजन वाढल्यानंतर संपूर्ण शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते. मधुमेह, कोलेस्ट्रॉल किंवा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे शरीराचे वजन नेहमीच नियंत्रणात असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा वाढलेले वजन कमी करताना महिलांसह पुरुष देखील बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पेयांचे किंवा प्रोटीनशेकचे सेवन करतात. मात्र यामध्ये असलेल्या हानिकारक पदार्थांमुळे शरीराचे कार्य बिघडते. याशिवाय किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना शरीराला सहन होणाऱ्या योग्य पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
Heart Attack चे मूळ आहे घाणेरडे कोलेस्ट्रॉल, नसांमधील पिवळी घाण साफ करतील 5 पदार्थ
वजन वाढल्यानंतर शरीरावर अनावश्यक चरबी जमा होण्यास सुरुवात होते. अशावेळी अनेक महिला सकाळी उठून उपाशी पोटी लिंबू पाणी किंवा दालचिनीच्या पाण्याचे सेवन करतात. याशिवाय चिया सीड्सचे पाणी, दालचिनीच्या पावडरचे पाणी इत्यादी अनेक गोष्टी प्यायला जातात, मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करून आयुर्वेदिक पावडर तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पावडरचे महिनाभर नियमित सेवन केल्यास वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल आणि शरीर स्लिम दिसू लागेल.
तयार करून घेतलेली आयुर्वेदिक पावडर तुम्ही दिवसभरातून तीन वेळा पिऊ शकता. यामुळे वाढलेले वजन झपाट्याने कमी होईल. याशिवाय शरीरावर साचून राहिलेला चरबीचा थर कमी होईल. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा पावडर मिक्स करून सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. याशिवाय तुम्ही पावडर नुसतीच खाऊन त्यावर तुम्ही पाणी पिऊ शकता. आयुर्वेदिक पावडरमध्ये असलेले सर्व मसाले आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. महिलांनी रोजच्या आहारात जिऱ्याचे सेवन करावे. कारण आरोग्यासंबंधित अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी जिरं अतिशय प्रभावी ठरते. इतर मसाल्यांमध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.