दैनंदिन आहारातील 'हे' पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्यास शरीराचे होईल नुकसान
शरीर कायम निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. फळे, पालेभाज्या, संपूर्ण धान्य, श्रीधान्य, मसाले आणि इतर पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर तंदुरुस्त आणि हेल्दी राहते. पण बऱ्याचदा आहारात चुकीच्या पद्धतीने पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला ते पदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. ज्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. पोटात दुखणे, पोट फुगणे, गॅस,अपचन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दैनंदिन आहारातील अन्नपदार्थ कशा पद्धतीने खावेत? अन्नपदार्थ खाण्याची योग्य पद्धत काय? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.(फोटो सौजन्य – iStock)
निरोगी आरोग्यासाठी अळशीच्या बिया अतिशय पौष्टिक आहेत. अळशीच्या बियांमध्ये आढळून येणारे फायबर शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरते. यामध्ये फायबर, ओमेगा-3 फॅटी ऍसिड आणि इतर पोषक तत्वे मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते, पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत राहतात इत्यादी अनेक फायदे शरीराला होतात. पण अनेक लोक अळशीच्या बिया संपूर्ण चावून खातात. पण या पद्धतीने खालेल्या बिया शरीरातून तशाच बाहेर येतात. त्यामुळे अळशीच्या बिया बारीक वाटून खाव्यात. वाटून खाल्लेल्या बिया शरीराला सहज पचन होतात.
जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीच्या वापरामुळे पदार्थाची चव आणि रंग वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेले क्युमिन शरीरासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारतात. कोणत्याही गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी हळदीचा वापर करावा. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी हळदीच्या दुधाचे सेवन करावे. हळदीचे सेवन करताना नुसतीच हळद खाऊ नये. हळदीमध्ये काळीमिरी मिक्स करून खावी.
अनियमित मासिक पाळी असू शकते गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण, तज्ज्ञांचा खुलासा
मशरुम किंवा अळंबींचे सेवन करणे आरोग्यासाठी पौष्टिक आहे.यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे इत्यादी अनेक पोषक घटक आढळून येतात. याशिवाय रक्तक्षय, हृदयविकार आणि कर्करोग इत्यादी आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात अळंबीचे सेवन करावे. जेवणातील अनेक पदार्थ बनवताना अळंबीचा वापर केला जातो.