थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी 'या' रसाचे करा सेवन
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, चुकीचा आहार, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर दिसून आल्यांनतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. त्यात महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे थायरॉईड. प्रत्येक घरातील एक तरी महिला थायरॉईड या गंभीर आजाराने त्रस्त आहे. शिवाय रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार इत्यादी अनेक आजारांचे रुग्ण वाढू लागले आहेत.महिलांमध्ये थायरॉईडची समस्या उद्भवू लागल्यानंतर वजन झपाट्याने वहडते किंवा कमी होते. तसेच शरीराच्या इतर भागांवरसुद्धा परिणाम दिसून येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वाढलेले थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारासोबतच कोणत्या रसाचे नियमित सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
अंबाडीच्या बिया आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहेत. दैनंदिन आहारात रोज एक चमचा बियांचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. तसेच अंबाडीच्या बियांच्या रसामुळे हार्मोन्स संतुलित करण्यास मदत होते. अंबाडीच्या बियांचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम अंबाडीच्या बिया पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर बिया मिक्सरच्या भांड्यात टाकून बिया बारीक वाटून घ्या.तयार केलेल्या रसात लिंबाचा रस मिक्स करून प्या. यामुळे वाढलेला थायरॉईड नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
आरोग्यासाठी पालक अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दैनंदिन आहारात पालकचे सेवन करावेव . थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी पालकच रस पिणे हा नैसर्गिक उपाय आहे. रस बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पालक टाकून त्यात आल्याचा तुकडा टाकून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. हा रस नियमित प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. थायरॉईडमुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी दैनंदिन आहारात पालक आल्याच्या रसाचे सेवन करावे.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
बीट गाजर अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही त्यांना रस बनवून देऊ शकता. थायरॉईड नियमित ठेवण्यासाठी नियमित बीट गाजरचा रस प्यावा. ज्युस बनवताना एक गाजर, एक बीटरूट, एक डाळिंब आणि एक सफरचंद धुवून स्वच्छ बारीक करून घ्या. मिक्सरच्या भांड्यात तयार केलेले सर्व साहित्य टाकून मिक्सरमधून वाटून घ्या. त्यानंतर ज्युस गाळून तुम्ही या रसाचे सेवन करू शकता. शरीरात निर्माण झालेली लोह, विटामिन ए आणि फॉलिक ॲसिडच कमतरता कमी करण्यासाठी बीट गाजरच्या रसाचे सेवन करावे.