
तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर भरमसाट पिंपल्स आणि मुरूम येतात? 'या' टिप्स फॉलो करून घ्या त्वचेची काळजी
प्रत्येकाची त्वचा एकसारखी नसते. काहींची त्वचा खूप जास्त कोरडी तर काहींची त्वचा खूप जास्त तेलकट आणि पिंपल्सने भरलेली असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स त्वचेचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट करून टाकतात. मुरुम, ब्लॅकहेड्स, मोठे पोर्स आल्यानंतर त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींनी चेहऱ्याची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण सूर्याच्या अतिनील किरणांमुळे चेहऱ्यावर टॅनिंग वाढते आणि त्वचा काळपट दिसते. उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचेवर जमा होण्याऱ्या तेलामुळे चिकटपणा वाढतो आणि मेकअप खराब होऊन जातो. तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमित दोनदा फेसवॉश करणे आवश्यक आहे. यासोबतच त्वचेला सूट होईल अशाच स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करावा, अन्यथा त्वचेला हानी पोहचू शकते.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा, क्रीम, लोशन इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. पण चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सला चुकीची क्रीम लावल्यानंतर ते कमी होण्याऐवजी ते आणखीनच वाढतात आणि चेहऱ्यावरील पिंपल्स वाढण्याची जास्त शक्यता असते. बऱ्याचदा शरीरात ऍसिडिटी किंवा पित्ताचे प्रमाण वाढल्यानंतर चेहऱ्यावर आणि कपाळावर मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स काही महिला नखांनी कोचून फोडतात. यामुळे पिंपल्स कमी होण्याऐवजी आणखीनच वाढतात आणि चेहरा खराब करून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तेलकट त्वचेची कशा पद्धतीने काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
चेहऱ्यावर आलेले मुरूम किंवा पिंपल्स हाताने अजिबात फोडू नये. हाताने फोडल्यास डाग कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जातात. चेहऱ्यावर जमा झालेले तेल योग्य वेळी स्वच्छ करणे आवश्यक आहे. अन्यथा त्वचेच्या छिद्रांमध्ये धूळ, मातीचे कण जमा होऊन जातात. त्वचा स्वच्छ करण्यासाठी दिवसभरातून दोनदा अतिशय सौम्य फेशवॉशने त्वचा स्वच्छ करावी. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने चेहरा स्वच्छ पुसून घ्या. त्यानंतर ऑइल-फ्री आणि वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझर वापरावे. तेलकट त्वचा असलेल्या महिलांना कायमच वाटते की मॉइश्चरायझर लावण्याची काहीच आवश्यकता नाही. पण असे न करता दिवसभरात दोनदा किंवा तीनदा मॉइश्चरायझर लावावे.
त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. आठवड्यातून एक-दोन वेळा त्वचेवर एक्सफोलिएशन करावे. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली मृत त्वचा नष्ट होण्यास मदत होते. चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत त्वचेमुळे त्वचेच्या समस्या खूप जास्त वाढतात. सगळ्यात आवश्यक गोष्ट म्हणजे घरातून बाहेर पडताना किंवा घरी असल्यानंतर सुद्धा नियमित सनस्क्रीन लावावे. ऑइल-फ्री किंवा मॅट फिनिश सन्स्क्रीन त्वचेवर तेल वाढू देत नाही. त्वचा आतून हायड्रेट ठेवते. चेहऱ्यावर वाढलेल्या पिगमेंटेशनमुळे मेकअप केल्यानंतर सुद्धा त्वचा चांगली दिसत नाही. त्यामुळे तेलकट त्वचेची योग्य स्किन केअर आणि आहार घेऊन काळजी घ्यावी.