
ओठांजवळील निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा सुंदर करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर, टॅन होईल कमी
महिलांसह पुरुष सुद्धा कायमच चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि टॅनिंग घालवण्यासाठी सतत काहींना काही केले जाते. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी त्वचेची काळजी घेण्यासाठी विविध महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण सतत केलेल्या ट्रीटमेंटमुळे उतार वयात त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच नैसर्गिक आणि घरगुती उपाय त्वचेसाठी करावेत. डोळ्यांखाली काळे डाग वाढवण्यासोबतच ओठांजवळ सुद्धा काहीवेळा काळे डाग येतात. ओठांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी वॅक्सिंग किंवा इतर अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. पण तरीसुद्धा फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओठांभोवती वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे ओठांभोवती वाढलेला काळेपणा कमी होईल आणि त्वचा अतिशय सुंदर दिसेल.(फोटो सौजन्य – istock)
ओठांभोवती काळेपणा वाढण्याची असंख्य कारणे आहेत. जास्त वेळ सूर्यप्रकाशात गेल्यामुळे त्वचेत मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि त्वचा गडद दिसू लागते. याशिवाय शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे सुद्धा त्वचेवर काळेपणा वाढतो. महिलांमध्ये गर्भधारणा, पीसीओडी, किंवा हार्मोन्समध्ये होणारे चढउतार इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेसोबत शरीराची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. काहींना सतत लिपस्टिक आणि लिपबाम लावण्याची सवय असते. पण सतत हानिकारक केमिकल युक्त लिपस्टिक लावल्यामुळे ओठांभोवती टॅन वाढतो आणि त्वचा काळी पडते.
ओठांभोवती वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी सर्वप्रथम त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. याशिवाय घराबाहेर पडताना कायमच सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यामुळे ओठांवर वाढलेला काळेपणा कमी होण्यास मदत होते आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. दिवसभरात दोनदा फेसवॉशने त्वचा स्वच्छ करावी. कोणत्याही केमिकल युक्त स्किन केअरचा वापर त्वचेसाठी करू नये. आठवड्यातून दोनदा स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. स्क्रब केल्यामुळे त्वचेला काळवंडलेला रंग उजळदार होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेची काळजी घेताना कोणत्याही चुकीच्या प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करू नये.
ओठांवर वाढलेला काळेपणा घालवण्यासाठी बटाट्याचा रस, काकडीचा रस किंवा कोरफडी जेल ओठांभोवती असलेल्या त्वचेवर लावावा. यामुळे त्वचेची पोत सुधारते आणि चेहरा उठावदार होतो. तसेच त्वचेवर लिंबाचा रस थेट लावू नये. यामुळे स्किन इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी संतुलित आहार, भरपूर पाणी आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. शांत झोप घेतल्यास त्वचा आतून सुधारण्यास मदत होते.