
'या' फळांचे एकत्र सेवन केल्यास आरोग्यावर होतील विपरीत परिणाम, सकाळच्या नाश्त्यात अजिबात करू नका सेवन
सकाळच्या नाश्त्यात आपल्यातील अनेकांना फळे खाण्याची सवय असते. फळांचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते, त्वचेवर ग्लो येतो. केसांची चमक वाढते, शरीर डिटॉक्स होते आणि आरोग्य कायमच मजबूत राहण्यास मदत होते. पण बऱ्याचदा नाश्त्यात दूध आणि फळे किंवा दही आणि फळे एकत्र खाल्ली हातात. चुकीच्या पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम दिसून येतात आणि आरोग्याला हानी पोहचते. कोणत्याही वेळी चुकीच्या पदार्थांचे कॉम्बिनेशन एकत्र खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
आता पुन्हा बोलता येणार! आधुनिक कर्करोग उपाय, आवाज वाचवण्याची नवी शक्यता झाली जागृत, कारणं आणि उपचार
शरीर तंदुरुस्त ठेवायचे असल्यास आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश असावा असे आपण वारंवार ऐकतो, वाचतो. यातही प्रकृतीनुसार कोणत्या व्यक्तीने कोणते फळ खाल्लेले चांगले ते किती प्रमाणात खावे याच्या काही मर्यादा असतात. मात्र कोणत्या फळासोबत कोणते फळ किंवा भाजी खाल्यास ते आरोग्यासाठी चांगले नसते ते पाहणेही तितकेच आवश्यक आहे. विरुद्ध गुणधर्म असणारी फळे ही केवळ घातकच नसतात तर पोटाच्या विकारांचे महत्त्वाचे कारण ठरू शकतात. ही फळे किंवा भाज्या एकमेकांसोबत खाल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
संत्री आणि गाजर कधीच एकाचवेळी आपल्या आहारात येणार नाही याची काळजी घ्यावी. अनेकदा समारंभामध्ये जेवायला गेल्यावर आपण त्याठिकाणी सॅलेडमध्ये गाजर घेतो आणि फ्रूटडिशमधील संत्रेही खातो. कधीतरी घरीही असे होऊ शकते. मात्र त्यामुळे अॅसिडीटी होत असून छातीत जळजळ होते. इतकेच नाही या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने किडनीला इजा होऊ शकते.
पपई ही प्रकृतीने उष्ण असते तर लिंबू अॅसिडीक असते. हे दोन्ही एकत्र खाल्ल्यास अॅनिमिया होण्याचा धोका असतो. याशिवाय हे दोन्ही पदार्थ एकत्रित खाल्ल्याने हिमोग्लोबिनचे असंतुलन होते. लहान मुलांच्या प्रकृतीसाठीही अशाप्रकारे लिंबू आणि पपई एकत्रित खाणे घातक ठरू शकते.
केळ आणि पेरू ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. या दोन्ही फळांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. मात्र ही दोन्ही फळे एकत्रित खाल्ल्यास आपल्याला भविष्यात काही आजारांचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये अॅसिडीटी, गॅसेस आणि डोकेदुखी अशा त्रासांना सामोरे जावे लागते.
‘Intimate Wash’ चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी
आंबट फळे आणि दूध हे दोन्ही गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. फ्रूटसॅलेडसारख्या पदार्थांमध्ये आपण अननस आणि संत्री हे दोन्ही घटक एकत्र करुन खातो. मात्र त्यामुळे आरोग्याला विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
Ans: मुळा आणि उडीद डाळ एकत्र खाऊ नये, तसेच केळी आणि दूध यांचे मिश्रण टाळावे. तेलकट, मसालेदार आणि दुग्धजन्य पदार्थ एकत्र खाणे टाळावे.
Ans: दुग्धजन्य पदार्थ, मसालेदार आणि तेलकट पदार्थ, जे पोटात जळजळ करू शकतात.
Ans: योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. चुकीचा आहार अपचन आणि दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांना आमंत्रण देऊ शकतो.