'Intimate Wash' चा अतिवापर शरीरासाठी ठरेल जीवघेणा! महिलेच्या शरीरातील हे अवयव झाले पूर्णपणे निकामी
युटीआय इन्फेक्शनची लक्षणे?
इन्टिमेट वॉशचा अतिवापर केल्यास उद्भवणाऱ्या समस्या?
युटीआय इन्फेक्शनची लागण कशामुळे होते?
शरीरातील नाजूक अवयवांच्या स्वच्छतेसाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. नाजूक अवयव स्वच्छ ठेवणे फार महत्वाचे आहे, अन्यथा शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. सर्वच महिला नाजूक अवयवांच्या स्वच्छतेसाठी इन्टिमेट वॉश किंवा बाजारात उपलब्ध असलेले व्हजायनल वॉश’ वापरतात. पण अतिवापर केल्यामुळे नाजूक अवयवांना इजा पोहचते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४० वर्षीय महिलेचा व्हजायनल वॉश’ च्या अतिवापरामुळे आरोग्यासंबंधित जीवघेणा संसर्ग झाला आहे. मूत्रमार्गात इन्फेक्शन वाढल्यानंतर ते हळूहळू किडनीपर्यंत पोहचते आणि शरीरातील अवयव निकामी होऊन जातात. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीमध्ये महिला काम करते. गेल्या सहा महिन्यापासून तिला वारंवार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होत होते., युटीआय झाल्यानंतर आराम मिळवून देण्यासाठी अँटिबायोटिक्स दिल्या जायच्या. यामुळे महिलेला तात्पुरता आराम मिळायचा. पण त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी महिलेला युटीआय इन्फेक्शनची लागण व्हायची. त्यानंतर तिला मधुमेह किंवा किडनी स्टोन यांसारखा कोणताही जुना आहे का, याची तपासणी सुद्धा करण्यात आली. पण असे काही आढळून आले नाही.
इन्फेक्शनची लागण झाल्यानंतर एक दिवशी महिलेला अचानक १०४ ताप येऊन उलट्या होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या विविध चाचण्यांमधून तिला ‘युरोसेप्सिस’ नावाच्या गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. यात शरीरातील अवयव हळूहळू काम करणे पूर्णपणे बंद करून टाकतात. अतिस्वच्छता आणि केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे नाजूक अवयवांचे आरोग्य बिघडून जाते. महिला दर ३ ते ४ दिवसातून एकदा किंवा दोनदा ‘व्हजायनल वॉश’ चा वापर करत होती. यामुळे नाजूक अवयव स्वच्छ राहतील आणि कोणतेही इन्फेक्शन होणार नाही. पण तज्ज्ञांच्या मते, योनीमार्गामध्ये चांगल्या बॅक्टेरिया आढळून येतात, ज्यामुळे नाजूक अवयवांचे पीएच संतुलित राहते. पण सुगंधी आणि केमिकल युक्त वॉशचा वापर केल्यास नाजूक अवयवांना हानी पोहचते. अतिवापरामुळे नैसर्गिक कवच निघून जाते आणि चांगल्या बॅक्टरीया नष्ट होतात.
योनीच्या स्वच्छतेसाठी कोणत्याही केमिकल युक्त किंवा सुगंधी प्रॉडक्टचा वापर अजिबात करू नये. असे केल्यास जीवावर त्याचे गंभीर परिणाम बेतू शकतात. योनीमार्ग हा स्वतःची स्वच्छता स्वतः करणारा अवयव आहे, असे मानले जाते. चुकीच्या वॉश किंवा इतर प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे नैसर्गिक ओलावा आणि बॅक्टेरियांचं संतुलन बिघडते आणि लघवी मार्गात इन्फेक्शनचा धोका वाढतो. तुम्हाला जर दर सहा महिन्यातून एकदा युटीआय संसर्ग होत असेल तर ही सामान्य समस्या नसून शरीरासाठी जीवघेणी आहे. वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात (मूत्रपिंड, मूत्राशय, मूत्रमार्ग, मूत्रवाहिनी) जिवाणू संसर्ग होणे, याला UTI म्हणतात.
Ans: किडनी स्टोन, प्रोस्टेट वाढणे, प्रतिकारशक्ती कमी असणे.
Ans: खूप पाणी प्या, स्वच्छता






