
थुंकीतून रक्त येतं? फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसूनयेतात 'ही' महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास ओढावेल मृत्यू
फुफ्फुसांचा कॅन्सर होण्याची कारणे?
फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी उपाय?
फुफ्फुसांच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे?
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये वेगवेगळ्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यातील धोकादायक आजार म्हणजे कॅन्सर. या आजाराचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा पायाखालील जमीन सरकून जाते. गंभीर आजार झाल्यानंतर अनेक वर्ष औषध उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरातील सर्वच अवयव निरोगी राहण्यासाठी फार आवश्यक आहेत. शरीराला सजीव आणि कार्यरत ठेवण्याचे काम फुफ्फुस करतात. प्रत्येक श्वास आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजन पुरवते. पण जीवनशैलीतील होणारे बदल, धूम्रपानाची सवय, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम फुफ्फुसांवर पडतो. त्यामुळे जागतिक पातळीवर फुफ्फुसांचा कॅन्सर अतिशय धोकादायक मानला जातो. चला तर जाणून घेऊया फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे आणि फुफ्फुस स्वच्छ, निरोगी राहण्यासाठी कोणते उपाय करावेत.(फोटो सौजन्य – istock)
साखर तर फक्त निमित्त! ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही
सकाळी उठल्यानंतर नियमित प्राणायाम किंवा योगासने केल्यास फुफ्फुसांची क्षमता सुधारण्यास मदत होईल. यामुळे फुफ्फुसातील साचलेली विषारी हवा बाहेर पडून जाईल. प्राणायामामुळे फुफ्फुसांना शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा होऊन श्वसनसंस्थेची शुद्धी होते. खोल श्वास घेऊन वेगाने सोडल्यास फुफ्फुसांच्या शेवटच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो आणि फुफ्फुसांवर वाढलेला तणाव कमी होतो. फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी हळदीचे सेवन करावे. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन आणि अँटीऑक्सिडंटयुक्त घटक फुफ्फुसांमध्ये वाढलेली जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. आलं, लसूण, ब्रोकोली इत्यादी भाज्यांच्या सेवनामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Ans: होय. थुंकीतून रक्त येणे (Hemoptysis) हे फुफ्फुसांच्या कर्करोगासह इतर अनेक श्वसनविकारांचेही लक्षण असू शकते. मात्र हे लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: सतत खोकला येणे, खोकल्याचे स्वरूप बदलणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, वजन झपाट्याने कमी होणे, भूक मंदावणे, सतत थकवा आणि वारंवार छातीचे संसर्ग होणे ही काही सामान्य लक्षणे आहेत.
Ans: क्षयरोग (TB), न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस, फुफ्फुसांचा संसर्ग, ब्रॉन्किएक्टेसिस किंवा इतर श्वसनसंस्थेचे विकार यांमुळेही थुंकीत रक्त येऊ शकते.