Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार
गोड पदार्थ किंवा साखरेचे अतिसेवन वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. वजन वाढल्यामुळे शरीरात इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मात्र, फक्त साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो, असे म्हणणे चुकीचे आहे.
कुटुंबातील आई, वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून रक्तातील साखरेची पातळी तपासत राहणे गरजेचे आहे.
दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणे, नियमित व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली कमी असणे यामुळे वजन वाढते. त्याचा परिणाम शरीराच्या इन्सुलिन वापरण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न, फास्ट फूड, साखरयुक्त पेये आणि अधिक कॅलरीयुक्त आहार यामुळे लठ्ठपणा वाढतो. विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी मधुमेहासाठी घातक मानली जाते.
दीर्घकाळ मानसिक ताण, अपुरी झोप आणि अनियमित दिनचर्या यांचा शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते.






