Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Potato Cheese Balls: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! बनवा क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्स; नोट करा सोपी रेसिपी

Potato Cheese Balls Recipe: बाहेरचे स्नॅक्स खाण्याऐवजी घरच्या घरी सहज तयार करा खुसखुशीत पोटॅटो चीज बॉल्स. मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही डिश आवडेल, सोपी रेसिपी , जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 10, 2026 | 08:54 PM
photo- Ai Generated

photo- Ai Generated

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी गरमागरम, कुरकुरीत आणि चविष्ट खाण्याची इच्छा अनेकांना होते. अशावेळी घरच्या घरी बनवलेले पोटॅटो चीज बॉल्स हा उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून खुसखुशीत आणि आतून वितळलेल्या चीजने भरलेले हे बॉल्स प्रत्येक घासाला वेगळीच चव देतात. ही रेसिपी घरातील उपलब्ध साहित्य वापरून काही मिनिटांत तयार करता येते. टोमॅटो सॉस, मेयोनीज किंवा आवडत्या डिपसोबत सर्व्ह केल्यास त्याची चव आणखी वाढते. चला तर  जाणून घेऊयात क्रिस्पी पोटॅटो चीज बॉल्सची रेसिपी.

Skin Care Tips: नॅचरल ग्लो हवाय? हजारो रुपयांच्या क्रीम्स विसरा! फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

साहित्य

  • ४ ते ५ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  • १ कप मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज (लहान तुकडे)
  • ½ कप ब्रेडक्रम्ब्स
  • २ चमचा कॉर्नफ्लोअर
  • १ बारीक चिरलेला कांदा (ऐच्छिक)
  • १ ते २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • १ चमचा काळी मिरी पावडर
  • १ लहान चमचा चिली फ्लेक्स
  • १ लहान चमचा ओरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

कृती

प्रथम उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करून घ्या. त्यात कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, काळी मिरी, चिली फ्लेक्स, हर्ब्स आणि थोडे ब्रेडक्रम्ब्स घालून मिश्रण एकजीव करा. आता या मिश्रणाचे लहान गोळे तयार करा. प्रत्येक गोळ्याच्या मध्यभागी चीजचा तुकडा ठेवून सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करा.

एका भांड्यात कॉर्नफ्लोअर आणि पाणी एकत्र करून पातळ मिश्रण तयार करा. तयार केलेले बॉल्स आधी कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा. अधिक कुरकुरीत पोत हवी असल्यास ही प्रक्रिया दोनदा करा. त्यानंतर कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर हे बॉल्स सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. गरमागरम पोटॅटो चीज बॉल्स टोमॅटो केचप, चिली सॉस, गार्लिक डिप किंवा मेयोनीजसोबत सर्व्ह करा. पार्टी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा पाहुण्यांसाठी हा एक बेस्ट स्टार्टर ठरू शकतो.

परफेक्ट पोटॅटो चीज बॉल्ससाठी खास टिप्स

  • बटाटे जास्त मऊ उकडू नका, अन्यथा मिश्रण सैल होईल.
  • चीज पूर्णपणे झाकले जाईल याची काळजी घ्या.
  • ब्रेडक्रम्ब्सचे डबल कोटिंग केल्यास बॉल्स अधिक कुरकुरीत होतात.
  • तेल मध्यम गरम असावे, त्यामुळे बॉल्स समान तळले जातात आणि चीज बाहेर येत नाही.
  • तळल्यानंतर लगेच सर्व्ह केल्यास आतले चीज वितळलेले आणि अधिक स्वादिष्ट लागते.
मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी रिकाम्या पोटी खावेत ‘हे’ पदार्थ; ब्लड शुगर दिवसभर राहील नियंत्रणात

Web Title: Crispy potato cheese balls recipe marathi easy snacks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • potato recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.