रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष
मोड आलेले मूग प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतात. सकाळी याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास पोट अधिक वेळ भरलेले राहते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत मिळू शकते.
रात्री पाण्यात भिजवलेले मेथीदाणे आणि त्याचे पाणी अनेकजण सकाळी घेतात. मेथीतील नैसर्गिक घटक कार्बोहायड्रेटचे शोषण मंदावण्यास मदत करू शकतात. मात्र, याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करावा.
दालचिनीचे पाणी किंवा हर्बल चहामध्ये दालचिनीचा मर्यादित वापर काही लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, याला औषधांचा पर्याय समजू नये आणि त्याचे अतिसेवन टाळावे.
बदाम, अक्रोड, जवस किंवा चिया बिया यांसारख्या पदार्थांमध्ये आरोग्यदायी फॅट, फायबर आणि प्रथिने असतात. योग्य प्रमाणात त्यांचा आहारात समावेश केल्यास सकाळचा नाश्ता अधिक पोषक बनू शकतो.
ओट्स, भाज्यांचा उपमा, बेसन चिल्ला, डाळी, कमी फॅटचे दही किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असलेला संतुलित नाश्ता दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतो. सकाळचा नाश्ता टाळणे योग्य नाही.
पावसाळ्यात केसांची चमक हरवली? फ्रिझी अन् गळणाऱ्या केसांसाठी ‘या’ हेअर केअर टिप्स ठरतील फायदेशीर






