Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chocolate: दररोज चॉकलेट खाणे आरोग्यदायी आहे का? ठरू शकते आरोग्यासाठी घातक, काय आहे सत्य

चॉकलेट खायला कोणाला आवडत नाही? पण तुम्ही रोज चॉकलेट खात असाल तर ते आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? काय सांगतात तज्ज्ञ? रोज चॉकलेट खाल्ल्यास आरोग्याला त्रास होतो का, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 07, 2026 | 08:07 PM
रोज चॉकलेट खाणे योग्य आहे का (फोटो सौजन्य - iStock)

रोज चॉकलेट खाणे योग्य आहे का (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • रोज चॉकलेट खाणे योग्य आहे का?
  • चॉकलेट नियमित खाणे आरोग्यासाठी किती त्रासदायक ठरू शकते
  • चॉकलेटबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले 
चॉकलेट हा जगभरातील सर्वाधिक आवडता खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आराम, आनंद, सण-उत्सव आणि खास क्षणांशी त्याचा संबंध जोडला जातो. मात्र, पोषणाविषयी जागरूकता वाढत असताना एक प्रश्न वारंवार विचारला जातो की, दररोज चॉकलेट खाल्ल्यास आरोग्य चांगले राहू शकते का?

तज्ज्ञांनी याचे उत्तर होय असं दिलं आहे. मात्र, हे तुम्ही कोणत्या प्रकारचे चॉकलेट निवडता, किती प्रमाणात खाता आणि तुमचा एकूण आहार कसा आहे यावर अवलंबून असते. चॉकलेटचे अनेक आरोग्यदायी फायदे असले तरी त्याचे अति सेवन किंवा निकृष्ट दर्जाच्या चॉकलेटची निवड केल्यास त्याचे दुष्परिणाम फायदेपेक्षा अधिक ठरू शकतात. डॉ. तहसीन सिद्दीकी Chief Dietician Saifee Hospital Mumbai यांनी याबाबत सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

Dark Chocolate: डार्क चॉकलेट खाणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर; पण कसे? जाणून घ्या

काय सांगतात डॉक्टर 

चॉकलेट हा काही केवळ गोड पदार्थ नाही. विशेषतः डार्क चॉकलेटमध्ये शरीरावर विविध प्रकारे परिणाम करणारी अनेक नैसर्गिक संयुगे (Natural Compounds) आढळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे फ्लॅव्हॅनॉल्स (Flavanols). कोकोमध्ये आढळणारे हे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार होण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या सैल होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊन हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो.

चॉकलेटमध्ये थिओब्रोमाइन (Theobromine) आणि अल्प प्रमाणात कॅफिन (Caffeine) देखील असते. त्यामुळे शरीराला सौम्य ऊर्जा मिळते आणि सतर्कता वाढते, मात्र कॉफीप्रमाणे तीव्र उत्तेजना जाणवत नाही.

याशिवाय कोकोमध्ये ट्रिप्टोफॅन (Tryptophan) आणि फेनाइलइथिलअमाइन (Phenylethylamine) यांसारखी संयुगेही असतात. ही संयुगे मेंदूमध्ये सेरोटोनिन (Serotonin) आणि डोपामाइन (Dopamine) या आनंददायी भावना निर्माण करणाऱ्या रसायनांच्या निर्मितीशी संबंधित आहेत. चॉकलेट हा तणावावर उपाय नसला तरी मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन केल्यास संतुलित आणि समाधानकारक जीवनशैलीचा तो एक भाग ठरू शकतो.

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

चॉकलेटचा आरोग्यावर होणारा परिणाम 

सर्व प्रकारचे चॉकलेट सारखे नसतात. चॉकलेटचा आरोग्यावर होणारा परिणाम मुख्यतः त्यातील कोकोच्या प्रमाणावर अवलंबून असतो. डार्क चॉकलेट (७० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक कोको असलेले) हा सर्वात आरोग्यदायी पर्याय मानला जातो. यात फ्लॅव्हॅनॉल्सचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असते. दररोज एक किंवा दोन छोटे तुकडे खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य, मेंदूचे कार्य आणि अँटिऑक्सिडंट्सचे सेवन वाढण्यास मदत होऊ शकते.

मिल्क चॉकलेटमध्ये साधारणपणे २० ते ३० टक्के कोको असतो. त्यामध्ये साखर आणि दुधाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे पोषणमूल्य तुलनेने कमी असते. याचे वारंवार सेवन केल्यास अतिरिक्त कॅलरी आणि साखरेचे प्रमाण वाढू शकते.

तर व्हाईट चॉकलेट हे पोषणाच्या दृष्टीने प्रत्यक्षात चॉकलेट मानले जात नाही. त्यात कोको बटर असते; मात्र कोको सॉलिड्स नसतात. त्यामुळे डार्क चॉकलेटमधील फायदेशीर अँटिऑक्सिडंट्स त्यामध्ये नसतात आणि ते प्रामुख्याने साखर व चरबीचा स्रोत असते. 

Web Title: Daily chocolate eating is good for health or any problem occurs what is the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 08:07 PM

Topics:  

  • Chocolate
  • Health Tips

संबंधित बातम्या

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?
1

Health Tips: गाड्यावरचा चहा किती वेळाने प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी ठरू शकतो धोकादायक?

How to Stay Happy & Healthy उतार वयातही आनंदी राहायचं आहे तर हा वापरा फॉर्मुला !
2

How to Stay Happy & Healthy उतार वयातही आनंदी राहायचं आहे तर हा वापरा फॉर्मुला !

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
3

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.